
अमेरिकेतली न्यूयॉर्क शहरात धक्कादायक घटना घडली आहे. येथे एक व्यक्ती मोठी साखळी घालून एमआरआयच्या रुममध्ये गेला. त्यानंतर एमआरआय मशीने त्याला चक्क ओढून घेतलं आहे.

या दुर्घटनेत त्या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृत्यू झालेल्या व्यक्तीचे वय 61 वर्षे आहे. ही व्यक्ती बुधवारी दुपारी नासाऊ ओपन एमआरआई (Nassau Open MRI) या ठिकाणी एमआरआय स्कॅनिंगसाठी गेला होता. त्याच वेळी मशीनीच्या चुंबकत्त्वामुळे तो त्या मशीनकडे ओढला गेला. त्याच्या गळ्यात असलेल्या धातूच्या साखळीमुळे त्याला मशीनने ओढले आणि यातच त्याचा मृत्यू झाला.

मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या गळ्यात एक धातूची साखळी होता. तो ही साखळी घालून एमआरआय मशीनच्या रुममध्ये गेला होता. याच वेळी मशीन चालू होती. मशीनने थेट त्याला आपल्याकडे खेचून घेतले.

त्यानंतर तो थेट मशीनमध्ये गेला. मशीन त्या व्यक्तीचे एमआरआय स्कॅन करू लागली. त्या मशीनमध्ये मृत व्यक्ती गोल गोल फिरली. त्यानंतर मात्र मशीन बंद केल्यानंतर संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे समोर आले.

दरम्यान, एमआरआय करताना शरीरावर कोणत्याही धातूचे दागिने नसावे, असे सांगितले जाते. ही बाब मृत व्यक्तीने न ऐकल्यामुळे यातच त्याचा मृत्यू झाला.