मंगळसूत्रावर सेफ्टी पिन लावताय? मग लगेचच काढा, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा सल्ला काय?

हिंदू धर्मात मंगळसूत्राला पवित्र आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते, जे पती-पत्नीमधील प्रेम दर्शवते. अनेकदा महिला मंगळसूत्रावर सेफ्टी पिन लावताना दिसतात. परंतु धार्मिक मान्यतेनुसार हे अशुभ आहे.

| Updated on: Oct 08, 2025 | 4:06 PM
1 / 6
हिंदू धर्मात मंगळसूत्राला अत्यंत पवित्र आणि विशेष महत्त्व आहे. भारतीय संस्कृतीत मंगळसूत्राला सौभाग्याचं लेणं मानले जाते. मंगळसूत्र परिधान केल्याने पती-पत्नीमध्ये प्रेम आणि बांधिलकी टिकून राहते, असे म्हटले जाते.

2 / 6
हिंदू लग्नसोहळ्यात दोन सोन्याच्या वाट्या आणि काळ्या मण्यांनी बनवलेल्या मंगळसूत्राला महत्त्व असते. मंगळसूत्र हा फक्त दागिना नसून भारतीय स्त्रीसाठी ते स्त्रीधन असते. पण आपण अनेकदा पाहिले असेल की आपली आई किंवा आजी हे मंगळसूत्रामध्ये सेफ्टी पिन लावायच्या.

3 / 6
पण धार्मिक विद्वानांच्या आणि पारंपरिक समजुतीनुसार, पवित्र मंगळसूत्रामध्ये सेफ्टी पिन लावणे अशुभ मानले जाते. मंगळसूत्राला सेफ्टी पिन लावल्यामुळे पतीच्या प्रगतीमध्ये बाधा येते, असे म्हटले जाते.

4 / 6
मंगळसूत्राला सेफ्टी पिन लावल्याने कुटुंबाच्या उत्पन्न वाढीमध्ये आणि आर्थिक स्त्रोतांमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे महिलांनी मंगळसूत्रावर सेफ्टी पिन लावणे टाळावे.

5 / 6
सेफ्टी पिन ही लोखंडाची बनलेली असते. धार्मिक मान्यतेनुसार लोखंडाचा धातू शनिदेवाशी संबंधित आहे. मंगळसूत्र हे पवित्र असते आणि त्याला लोखंड जोडल्यास घरात नकारात्मक ऊर्जा वाढते. तसेच पती-पत्नीच्या वैवाहिक जीवनात दुरावा निर्माण होण्याचा धोकाही वाढू शकतो, असे म्हटले जाते.

6 / 6
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)