
मराठी चित्रपटसृष्टीमधील सर्वांची आवडती आणि लाडकी अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळी ओळखली जाते. प्राजक्ताने आजवर अनेक चित्रपट, मालिका आणि वेब सीरिजमध्ये काम केले आहे. तिच्या प्रत्येक भूमिकेवर प्रेक्षकांनी प्रेम केले आहे. तसेच प्राजक्ता तिच्या सौंदर्याने देखील चाहत्यांना घायाळ करताना दिसते. सध्या प्राजक्ता एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. हे कारण ऐकून तुम्हीही चकीत व्हाल...

प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत चाहत्यांसोबत फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. तसेच ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत गप्पा देखील मारत असतो. चाहते देखील प्राजक्ताशी संवाद साधण्यासाठी आतुर असतात. पण सध्या प्राजक्ताने केलेल्या एका पोस्टमुळे चाहत्यांना धक्का बसला आहे.

प्राजक्ताने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो मुंबई विमानतळावरील आहे. हा फोटो शेअर करत प्राजक्ताने "बाय बाय मुंबई. मला तुझी खूप आठवण येईल. मी लवकरच परत येईन" असे कॅप्शन दिले आहे. त्यामुळे चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आता प्राजक्ता नेमकं कुठे चालली आहे हे तिच्या आगामी पोस्टवरुन कळेल.

सध्या सोशल मीडियावर प्राजक्ताची ही पोस्ट तुफान व्हायरल झाली आहे. प्राजक्ताची स्टोरी पाहून प्राजक्ता नेमकी निघाली कुठे? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. अनेकांनी ती परदेशात जात असल्याचा अंदाज लावला आहे, तर काहींनी बंगळुरूला आश्रमात जात असेल असे म्हटले. तर काहींनी प्राजक्ताची नवी देवदर्शन यात्रा सुरू झाली असावी असा अंदाज लावला आहे.

चाहत्यांची वाढलेली उत्सुकता पाहून तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने ती कुठे चालली आहे आणि कोणासोबत चालली आहे हे देखील सांगितले आहे. ती महाराष्ट्राची हास्यजत्राच्या टीमसोबत आहे. या फोटोमध्ये सचिन मोटे, सचिन गोस्वामी, सई ताम्हणकर, प्रसाद ओक, अमित फाळके अशी हास्यजत्रा कार्यक्रमाची संपूर्ण टीम दिसत आहे. तसेच ती कामानिमित्त नागपूरला चालली असल्याचे म्हटले आहे.