
मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय आणि कायम चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळी ओळखली जाते. प्राजक्ताने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. अनेकदा लोकांच्या मनात प्रश्न येतो की प्राजक्ता माळीची एकूण संपत्ती किती? चला जाणून घेऊया त्याविषयी...

'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेतील प्राजक्ताची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरली होती. दिसायला गोड, सोज्वळ अशा प्राजक्ताच्या आयुष्यात ही मालिका विशेष ठसा उमटवून गेली.

आज प्राजक्ता मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. प्राजक्ता विषयी जाणून घेण्यासाठी चाहते कायमच आतुर असतात.

प्राजक्ताने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती एका चित्रपटासाठी जवळपास 20 ते 25 लाख रुपये फी घेत असल्याचे म्हटले जाते. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण तिच्या कमाईतील सर्वाधिक वाटा हा चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करुन मिळतो.

प्राजक्ताने मुंबईत स्वत:चे घर घेतले आहे. तिच्या या घराला जवळपास 10 वर्षे झाली आहेत. तिने या निमित्त सोशल मीडियावर एक पोस्ट देखील शेअर केली होती.

प्राजक्ताचे स्वत:चे प्रोडक्शन हाऊस आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे. तिच्या प्रोडक्शन हाऊसचे नाव शिवोहम असे आहे. या प्रोडक्शन हाऊसच्या माध्यमातून तिने फुलवंती या चित्रपटाची निर्मिती केली होती.

2023मध्ये प्राजक्ताने स्वत:चा दागिन्यांचा ब्रँड सुरु केला आहे. प्राजक्ताला पारंपरिक दागिन्यांची आवड असल्यामुळे तिने प्राजक्तराज या दागिन्याच्या ब्रँडला सुरुवात केली.

त्यानंतर 2023मध्ये प्राजक्ताने कर्जत येथे आलिशान फार्महाऊस उभे केले. तिने या फार्महाऊसला 'प्राजक्तकुंज' असे नाव दिले. आता ती हे फार्महाऊस भाड्याने देखील देते.

प्राजक्ताने वयाच्या 35व्या वर्षी चांगली कमाई केली आहे. तिची एकूण संपत्ती 40 कोटी रुपयांच्या आसपास असल्याचे म्हटले जाते. तिची ही संपत्ती 2022मधील आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षात तिच्या संपत्तीमध्ये वाढ झाल्याचे म्हटले जात आहे.