Photo Nagpur Marbat Festival : नागपुरात दोन वर्षांनंतर मारबत मिरवणूक, शहीद चौकात होणार काळी-पिवळी मारबतीची गळाभेट
नागपुरात मारबत उत्सव सुरू झाला आहे. तब्बल दोन वर्षानंतर मारबतीची मिरवणूक निघाली. काळी आणि पिवळी मारबत यांची शहीद चौकात गळाभेट होईल. विद्यमान परिस्थितीवर भाष्य करणारे बडगे काढले आहेत.
दोन वर्षानंतर मारबतीची मिरवणूक निघाली. काळी आणि पिवळी मारबत यांची शहीद चौकात गळाभेट होईल
-
-
नागपुरात मारबत उत्सव सुरू झाला आहे. तब्बल दोन वर्षानंतर मारबतीची मिरवणूक निघाली. काळी आणि पिवळी मारबत यांची शहीद चौकात गळाभेट होईल. विद्यमान परिस्थितीवर भाष्य करणारे बडगे काढले आहेत.
-
-
पिवळी मारबत ही समृद्धीचं, विकासाचं प्रतीक आहे. काळ्या मारबतीसमोर लहान मुलांना दर्शनासाठी आणलं जातं. नागपूरबाहेरील लोकंही येथे मारबतीच्या दर्शनासाठी येतात.
-
-
भोसले घराण्यातील बाकाबाई या फितूर झाल्या. त्याच्या निषेधार्त ही काळी मारबत निघते. काळी मारत ही वाईट प्रवृत्तींचं प्रतीक आहे. भ्रष्टाचार, रोगराई घेऊन जा गे मारबतच्या घोषणा दिल्या जात आहेत.
-
-
दोन्ही मारबतींची गळाभेट शहीद चौकात होते. देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीपासून ही परंपरा अजूनही कायम आहे. कोरोनामुळं गेली दोन वर्षे ही मारबत मिरवणूक काढण्यात आली नव्हती.
-
-
मारबतीसोबत बडगे सोबत आहेत. 142 वर्षांची परंपरा या मिरवणुकीला आहे. मध्य भारतातला सगळ्यात मोठा उत्सव आहे. हजारो लोकं या मारबत मिरवणुकीत सहभागी झाले आहेत.