
मंगळ ग्रहावर जीवसृष्टी असल्याचा पुरावा पुन्हा एकदा सापडला आहे. वैज्ञानिकांनुसार तीन अब्ज वर्षांपूर्वी मंगळ ग्रहावर जेजेरो क्रेटर नावाच्या खड्ड्याजवळ पृथ्वीसारखेच वातावरण होते.

नासाचे पर्सिव्हियरेंस रोव्हर 2021 साली मंगळ ग्रहावर उतरले होते. याच रोव्हरने विश्लेषण करून जेजोरो क्रेटरजवळ असलेल्या जेजेरो मॉन्स नावाच्या पर्वतावर एक सक्रिय ज्वालामुखी होता, असे अनुमान लावले आहे.

या सध्या सध्या सक्रिय नसलेल्या ज्वालामुखीचा शोध वैज्ञानिकांनी अगोदरच लावला होता. मात्र त्याचा ठोस पुरावा पर्सिव्हियरेंस रोव्हर मंगळ ग्रहावर गेल्यावरच मिळाला.

या शोधाबाबत कम्युनिकेशन्स अर्थ अँड एन्व्हायरमेंटमध्ये याबाबतचे संशोधन प्रसिद्ध झालेले आहे. या संशोधनानुसार जेजेरो मॉन्स येथील ज्वालामुखी पृथ्वीवरच्या ज्वालामुखीशी मिळताजुळता आहे.

याआधीच्या रिसर्चनुसार 3.7 अब्ज वर्षांपूर्वी एका उल्कापिंडामुळे मंगळ ग्रहावर मोठा खड्डा पडला होता. यात पाणी भरल्यामुळे तिथे एक नदी तयार झाली होती. वैज्ञानिकांच्या मतानुसार मंगळ ग्रहावर अगोदर पाणी होते. आता या ग्रहावर ज्वालामुखी होते असे समोर आल्यानंतर तेथे जीवसृष्टी असू शकते, तिथे राहता येऊ शकतं या गृहितकाला बळकटी मिळाली आहे.

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही यातील कोणत्याही माहितीचा दावा करत नाही किंवा समर्थनही देत नाही. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)