Maruti Suzuki कंपनीची लोकप्रिय गाडी झाली महाग, जाणून घ्या किती पैसे मोजावे लागणार
मारुती सुझुकीच्या गाड्यांचा देशात मोठी मागणी आहे. पण आता देशात सर्वाधिक विक्री होत असलेली गाडी महागली आहे. मारुती सुझुकीने प्रीमियम हॅचबॅक बलेनो गाडीच्या किमतीत वाढ केली आहे.
मारुतीची कंपनीची गाडी घेण्याचा विचार करत आहात? नंबर वन कारची किंमत वाढली
-
-
फेब्रवारी 2023 मध्ये मारुति बलेनो देशात सर्वाधिक विक्री झालेली कार आहे. पण मारुती सुझुकी कंपनीने आता देशातील ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. कंपनीने बेस्ट सेलिंग कारच्या किमतीत वाढ केली आहे. दुसरीकडे इंजिन आणि सेफ्टी फीचर्स पण अपडेट केले आहेत. (Photo: Maruti Suzuki)
-
-
मारुती कंपनीने सर्व व्हेरियंटच्या किमतीत 5 हजार रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे कोणतंही व्हेरियंट विकत घेण्याचा विचार केला तरी वाढीव रक्कम द्यावी लागणार आहे. या व्यतिरिक्त बेस व्हेरियंट ईएसपी आणि हील होल्ड असिस्ट फिचर्ससह सादर केली आहे. (Photo: Maruti Suzuki)
-
-
बलेनोच्या बेस मॉडेलमध्ये ईएसपी दिलं गेल्याने हॅचबॅक कारची सेफ्टी आणखी वाढली आहे. त्यामुळे घाट रस्त्यात चालकाला मदत होईल. या फीचरमुळे स्लिप रोडवर गाडी चालवणं सोपं होईल. तसेच हील होल्ड असिस्टमुळे फायदा होईल.(Photo: Maruti Suzuki)
-
-
बलेनोमध्ये पूर्वीसारखं 12 व्होल्ट माइल्ड हायब्रिड सिस्टमसह 1.2 लिटर नॅच्युरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन पॉवर मिळते. यात 5 स्पीड मॅन्युअल एएमटी गियरबॉक्स आहे. (Photo: Maruti Suzuki)
-
-
मारुती सुझुकीची किंमत आता 6.61 लाखांपासून सुरु होईल आणि 9.88 लाखांपर्यंत (एक्स शोरूम) जाईल. (Photo: Maruti Suzuki)