Premanand Maharaj: यशस्वी भव! प्रेमानंद महाराजांचा विचार दाखवेल रस्ता
Premanand Maharaj on Successful: जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर चांगले विचार आयुष्यात तुम्हाला पुढे नेतात. जीवनात अनेकदा आयुष्यात फसल्यासारखं वाटते. प्रेमानंद महाराजांचा विचार तुम्हाला रस्ता दाखवेल. कोणते आहेत ते यशस्वी विचार?

मनुष्याच्या आता मोठी शक्ती आहे. त्यामुळे आत्म्याची शक्ती ओळखा. त्यांना जागृत करा. प्रत्येक अडचणीचे समाधान तुम्ही शोधा. प्रेमानंद महाराजांचा हा विचार तुम्हाला रस्ता दाखवेल.

सत्याचा मार्ग कठीण असतो. पण हा मार्ग तुम्हाला तुमच्या मुळ उद्देशापर्यंत पोहचवेल. हा मार्ग अडचणीचा असला तरी डगमगू नका. तुम्हाला हा मार्ग मोठ्या संकटापासून नक्कीच वाचवेल.

तुमचे विचारच तुमची दिशा ठरवतील. तुम्ही आनंद असाल तर आयुष्यात आनंद तितक्याच वेगाने परत येईल. पण तुम्ही नकारात्मक विचारांचे असेल तर तशाच घटना घडतील.

सकाळी उठल्यावर देवाचं, तुमच्या आई-वडिलांचं, गुरुदेवाचं नाव स्मरण करा. आज दिवसभरात काय करायचं याचा विचार निश्चित करा. चांगले विचार करा. दृढनिश्चिय सतत मनाला सांगा.

क्रोधापासून दूर राहा. शांत राहा. त्याच आधारे तुमचे जीवन पुढे जाईल. सातत्याने पुढे जाण्याचा विचार करा. सकारात्मक विचार करा.

कर्मावर विश्वास ठेवा. चांगले कर्म हेच तुमच्या प्रगतीचा सेतू आहे. चांगले कर्म करा आणि ते विसरून जा. त्याचा अंहकार अजिबात मनाशी बाळगू नका. तर तुमची प्रगती होईल.