सोन्याच्या ताटामध्ये जेवण करणारा एकमेव अभिनेता, ‘पहिला सुपरस्टार’ म्हणून ओळख, दिले अनेक ब्लॉकबस्टर, शेवटी जेलमध्ये काढलं आयुष्य

इंडस्ट्रीमधील पहिला सुपरस्टार, जो एकेकाळी सोन्याच्या ताटामध्ये करत होता जेवण. त्याचे अनेक चित्रपट ठरले ब्लॉकबस्टर, पण शेवटी जेलमध्ये काढलं आयुष्य. कोण आहे तो अभिनेता?

| Updated on: Feb 11, 2026 | 11:50 AM
1 / 6
तमिळ चित्रपटसृष्टीच्या इतिहासात काही व्यक्ती अशा आहेत, ज्यांचे आयुष्य स्वतःच एका चित्रपटासारखे भासते. प्रचंड यश, अफाट लोकप्रियता, ऐश्वर्य आणि त्यानंतर अचानक आलेला अंधार अशीच थरारक जीवनकहाणी होती तमिळ सिनेमाच्या पहिल्या सुपरस्टारची, एम. के. त्यागराज भगवतार यांची.

तमिळ चित्रपटसृष्टीच्या इतिहासात काही व्यक्ती अशा आहेत, ज्यांचे आयुष्य स्वतःच एका चित्रपटासारखे भासते. प्रचंड यश, अफाट लोकप्रियता, ऐश्वर्य आणि त्यानंतर अचानक आलेला अंधार अशीच थरारक जीवनकहाणी होती तमिळ सिनेमाच्या पहिल्या सुपरस्टारची, एम. के. त्यागराज भगवतार यांची.

2 / 6

अभिनेता दुलकर सलमानच्या आगामी ‘कांथा’ या चित्रपटातून त्यांची ही विस्मरणात गेलेली पण अत्यंत नाट्यमय कहाणी पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येत आहे. एम. के. त्यागराज भगवतार यांचा जन्म 1 मार्च 1910 रोजी तमिळनाडूतील मयिलादुतुरै येथे एका अत्यंत गरीब सुवर्णकार कुटुंबात झाला.

3 / 6

त्यांचे पूर्ण नाव मायावरम कृष्णस्वामी त्यागराजन भगवतार असे होते. लहानपणीच कुटुंब तिरुचिरापल्ली येथे स्थलांतरित झाले. तेथे त्यांनी स्थानिक शाळेत शिक्षण सुरू केले. मात्र संगीताची ओढ इतकी तीव्र होती की त्यांनी शिक्षण अर्धवट सोडले.

4 / 6

घरातून पळून जाऊन त्यांनी मदुरै येथे प्रसिद्ध संगीतगुरू पोन अय्यंगार यांच्याकडे तब्बल सहा वर्षे कठोर कर्नाटक संगीताचे प्रशिक्षण घेतले. या काळात त्यांनी भजनं, कीर्तनं आणि धार्मिक गीतांचे सखोल ज्ञान मिळवले. 1920 च्या दशकाच्या अखेरीस त्यांनी रंगमंचावर पाऊल ठेवले आणि त्यांच्या मधुर, भारदस्त आवाजाने प्रेक्षकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. अल्पावधीतच ते रंगभूमीवरील सुपरस्टार बनले.

5 / 6

त्यांनी एकूण 14 चित्रपटांत काम केले, त्यापैकी 7 चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले. याच काळात त्यांना ‘तमिळ सिनेमाचे पहिले सुपरस्टार’ हा मान मिळाला. मात्र, यशाच्या शिखरावर असतानाच त्यांच्या आयुष्यात भीषण वळण आले. पत्रकार लक्ष्मीकांतन हत्याकांडात त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला.

6 / 6

या प्रकरणात विनोदी अभिनेता एन. एस. कृष्णन यांच्यासह त्यांना अटक झाली आणि दोघांनाही तुरुंगवास भोगावा लागला. तब्बल 27 महिने ते तुरुंगात होते. नंतर लंडन कोर्टाने त्यांची निर्दोष मुक्तता केली, मात्र तोपर्यंत त्यांचे करिअर, लोकप्रियता आणि आर्थिक स्थिती पूर्णपणे कोलमडली होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us