‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद 4’चा ग्रँड फिनाले; कोण ठरणार विजेता? 6 स्पर्धकांमध्ये चुरस

शुभ्रा खाडे, अर्णव बोपलकर, विरा हाक्के, अस्मिता गादेकर, गंधर्व चामनर आणि ईशानी हिंगे या सहा जणांपैकी कोण विजेतेपद पटकावणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. या महाअंतिम सोहळ्यात रितेश देशमुख आणि जगविख्यात तालवादक तौफिक कुरेशी यांची विशेष उपस्थित असेल.

| Updated on: Apr 27, 2026 | 3:26 PM
1 / 5
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद'च्या चौथ्या पर्वाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. छोट्या उस्तादांनी आपल्या भारावून टाकणाऱ्या सुरांनी संपूर्ण महाराष्ट्राला मंत्रमुग्ध केलं आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या छोट्या उस्तादांमधून 6 सर्वोत्तम स्पर्धकांनी महाअंतिम फेरी गाठली आहे.

2 / 5
अप्रतिम गाणी सादर करुन प्रेक्षकांची मन जिंकलेल्या 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद 4' कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा येत्या शनिवारी आणि रविवारी म्हणजेच 2 आणि 3 मे रोजी रात्री 9 वाजता पाहायला मिळणार आहे. या महाअंतिम सोहळ्याचं खास आकर्षणं ठरणार आहेत जगविख्यात तालवादक तौफिक कुरेशी आणि महाराष्ट्राचा लाडका अभिनेता रितेश देशमुख यांची उपस्थिती.

3 / 5
तौफिक कुरेशी यांनी आपल्या अद्वितीय तालवादनाने छोटे उस्तादचा मंच मंत्रमुग्ध करुन टाकला आहे. खासकरुन आदर्श शिंदे आणि तौफिक कुरेशी यांच्यामधील जुगलबंदी लक्षवेधी ठरणार आहे. यानिमित्ताने एक जागतिक दर्जाचा सांगितीक अनुभव प्रेक्षकांना घेता येणार आहे.

4 / 5
दुसरीकडे, रितेश देशमुखने स्पर्धकांना खास भेट देत त्यांचं कौतुक केलं आहे. या दोन्ही दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीमुळे महाअंतिम सोहळ्याची रंगत द्विगुणीत होणार आहे. या दैदिप्यमान सोहळ्यात कोल्हापूरची शुभ्रा खाडे, ठाण्याचा अर्णव बोपलकर, नांदेडची विरा हाक्के, नाशिकची अस्मिता गादेकर, पुण्याचा गंधर्व चामनर आणि ईशानी हिंगे या सहा स्पर्धकांमध्ये महाअंतिम लढत रंगणार आहे.

5 / 5
त्यामुळे सुपरस्टार होण्याचा मान कोण पटकवणार याची उत्सुकता वाढली आहे. छोट्या उस्तादांना या पर्वात सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक आणि गायक सचिन पिळगांवकर, लोकप्रिय़ गायिका वैशाली सामंत, तरुणाईच्या गळ्यातला ताईत असणारा गायक आदर्श शिंदे आणि सुप्रसिद्ध संगीतकार जोडी अविनाश-विश्वजीत यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं. या संगीत महारथींच्या सानिध्यात छोट्या उस्तादांवर गाण्याचे संस्कार झालेत.

Follow Us