AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीने का निवडली 3 या क्रमांकाची जर्सी? ते गुपीत अखेर फुटलंच… कुणी दिला नंबर बदलण्याचा कानमंत्र

Vaibhav Suryavanshi Team India Jersey: भारताचा दमदार खेळाडू वैभव सूर्यवंशी याचे भारतीय संघासोबत खेळण्याचे स्वप्न अखेर पूर्ण होणार आहे. त्याला टीम इंडियाची जर्सी सुद्धा मिळाली आहे. पण त्याने 12 क्रमांकाची जर्सी नाकारून 3 क्रमांकाची जर्सी घेतली आहे. काय आहे त्यामागील कारण?

Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीने का निवडली 3 या क्रमांकाची जर्सी? ते गुपीत अखेर फुटलंच... कुणी दिला नंबर बदलण्याचा कानमंत्र
वैभव सूर्यवंशी
| Updated on: Jun 23, 2026 | 3:29 PM
Share

Vaibhav Suryavanshi: टीम इंडियासोबत खेळण्याचे वैभव सूर्यवंशीचे स्वप्न पूर्ण होणार आहे. भारत आणि आर्यलँड यांच्या दरम्यान 26 जूनपासून 2 सामन्यांची टी20 मालिका होत आहे. वैभव याला टीम इंडियाकडून सरप्राईज मिळाले आहे. त्याला भारतीय संघाची जर्सी मिळाली आहे. यासंबंधीचा त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण वैभव सूर्यवंशी याला 12 क्रमांकाची जर्सी मिळणार होती. तो क्रमांक बदलून त्याला 3 क्रमांकाची जर्सी देण्यात आली. कोणी दिला त्याला जर्सीचा क्रमांक बदलण्याचा सल्ला?

3 या नंबरची जर्सी घालून मैदानात धमाका

BCCI ने वैभव सूर्यवंशीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये टीम इंडियाचे सपोर्ट स्टाफचे सदस्य रघू हे हॉटेलच्या रुममध्ये वैभव सूर्यवंशी याला भारतीय जर्सी देण्यासाठी जातात. जसा वैभव बॉक्स उघडतो. त्याचा आनंद दुप्पट होतो. त्यानंतर तो जर्सी मागून आणि पुढून पाहतो. त्यावेळी त्याला 3 या नंबरची जर्सी देण्यात आल्याचा खुलासा करण्यात येतो. भारतीय दमदार खेळाडू सुरेश रैना, हरभजन सिंह आणि युजवेंद्र चहल यांच्या जर्सीचाही हाच क्रमांक होता.

12 क्रमांक नाकारून का निवडला 3 क्रमांक?

जेव्हा वैभव सूर्यवंशीने त्याच्या व्यावसायिक क्रिकेट जीवनाची सुरुवात केली. तेव्हा त्याने 12 क्रमांकाची जर्सी घातली. पण त्याच्या आईने त्याला हा क्रमांक बदलण्याचा सल्ला दिला. 12 अंकातील दोन अंक (1 + 2) जोडून एकूण 3 हा क्रमांक येतो. मग 12 या क्रमांकापेक्षा थेट 3 हा अंक निवडणे काय चुकीचे आहे, असा मंत्र त्याच्या आईने दिला. वैभवने आईचा सल्ला ऐकला.

जर्सी भेटल्यानंतर काय म्हणाला वैभव?

टीम इंडियाची जर्सी मिळाल्यानंतर वैभव सूर्यवंशीचा आनंद दुप्पट झाला. तो म्हणाला, “हे एखाद्या स्वप्नासारखे आहे. ज्या उद्देशासाठी मी बॅट हाती घेतली आणि मैदानावर उतरलो. ते स्वप्न आज पूर्ण झाले आहे. मी हा आनंद आज शब्दात मांडू शकत नाही. हे सर्व स्वप्नवत वाटत आहे. ही बाब मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. कधी कधी तुम्ही जे विचार करता, ते तुम्हाला मिळते. माझ्यासोबत सुद्धा असेच काहीसे झाले आहे.”

Follow Us
NCP शरद पवार गटातील 8 खासदारांची मोदींसोबत बैठक; रोहित पवार म्हणाले...
NCP शरद पवार गटातील 8 खासदारांची मोदींसोबत बैठक; रोहित पवार म्हणाले, 17 तारखेला...
ठाण्याच्या टिकोजीरावांना निवडणूक आयोगाने परस्परच... संजय राऊतांची टीका
ठाण्याच्या टिकोजीरावांना निवडणूक आयोगाने परस्परच... बोलता बोलता संजय राऊत असं काही म्हणाले की.. विधानाची तुफान चर्चा
समृद्धी महामार्गावर चक्काजाम आंदोलन, सत्यजित तांबे आणि पोलिसात झटापट,
समृद्धी महामार्गावर चक्काजाम आंदोलन, सत्यजित तांबे आणि पोलिसात झटापट, आंदोलक आक्रमक
आदित्य ठाकरे आणि CJP पदाधिकाऱ्यांच्या भेटीत नेमकं काय घडलं? Inside...
आदित्य ठाकरे आणि CJP पदाधिकाऱ्यांच्या भेटीत नेमकं काय घडलं? अखेर Inside स्टोरी समोर
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्..
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्...हादरवून टाकणारं प्रकरण समोर!
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, 'माझं...
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, “माझं रक्तच तसं नाही जे कोणी...
Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; 1.1 कोटींची गुंतवणूक
Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; सिंगापूर करणार 1.1 कोटींची गुंतवणूक अन्...
तुकाराम मुंढेंचं ‘कॉक्रोच’बाबत विधान अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट,
तुकाराम मुंढेंचं ‘कॉक्रोच’बाबत विधान अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट, पहा नेमकं काय काय म्हणाले?
राज ठाकरेंचा आरोप अन् फडणवीस सरकार ॲक्शन मोडमध्ये! सिद्धिविनायक...
मोठी बातमी! राज ठाकरेंचा आरोप अन् फडणवीस सरकार ॲक्शन मोडमध्ये! सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळ्याची चौकशी होणार
गुणरत्न सदावर्तेंचं गाणं चर्चेत; जरांगे पाटलांसह शिंदे-सामंतांना....
Gunratna Sadavarte | पळा, पळा, पळा अरे...जरांगेंचा काळ...गुणरत्न सदावर्तेंचं गाणं चर्चेत; जरांगे पाटलांसह शिंदे-सामंतांना गाण्यातून डिवचलं