AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rupali Thombre Patil: लाली लिपस्टिक लावली म्हणजे अक्कल येते असं नाही; रुपाली ठोंबरेंची रुपाली चाकणकरांवर जोरदार टीका

Rupali Chakankar: राष्ट्रवादीच्या दोन रुपालींमध्ये वाद चांगलाच पेटला होता. आता पुन्हा एकदा या दोन्ही नेत्यांमध्ये नवा वाद पेटला आहे. नेमकं काय घडलं? वाचा...

Rupali Thombre Patil: लाली लिपस्टिक लावली म्हणजे अक्कल येते असं नाही; रुपाली ठोंबरेंची रुपाली चाकणकरांवर जोरदार टीका
रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरेImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Sep 23, 2026 | 2:37 PM
Share

नाशिक येथील भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या तथा महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे नाव घेण्यात आले होते. त्यांचा अशोक खरात यांच्यासोबतचा एक फोटो समोर येताच वेगवेगळ्या चर्चा रंगल्या होत्या. राष्ट्रवादी पक्षाच्याच नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी चाकणकरांवर टीका केली होती. राष्ट्रवादीच्या दोन रुपालींमध्ये वाद चांगलाच पेटला होता. आता पुन्हा एकदा या दोन्ही नेत्यांमध्ये नवा वाद पेटला आहे. कोणी लाली लिपस्टिक लावली म्हणजे अक्कल येते असं नाही, असा बोचरा वार रुपाली चाकणकर यांनी ठोंबरे यांच्यावर केलाय.

रुपाली चाकणकर यांनी नुकताच बोलताना स्वत:ची तुलना सावित्री बाई फुले यांच्याशी केली होती. त्यानंतर रुपाली ठोंबरे पाटील यांनी त्यांना चांगलेच सुनावले आहे. “त्यांनी येऊन मी सावित्रीची लेक आहे, मी अत्यंत जबाबदारीने सांगत आहे रुपाली चाकणकर तुमची पात्रता नाही सावित्री माईंचे नाव घेण्याची. कारण महत्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले यांची हयात गेली. अंधश्रद्धेच्या विरोधात लोकांची जनजागृती करण्यामध्ये आणि तुम्ही काय केलं? तुम्ही राज्य महिला आयोगावर जिथे महिलांना वाचवायचं होतं, महिलांना आधार द्यायचा होता त्याच महिलांना भोंदूबाबाच्या शिकारीसाठी अलगदमध्ये पोहोचवणाऱ्या तुम्ही आहात” असे रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या.

पुढे त्या म्हणाल्या की, त्याच्यामुळेच सांगितलं की चाकणकरांचा वरचा मजला तर कमीच आहेच. लाली लिप्स्टीक लावली म्हणजे अक्कल येते असं नाही.

काय म्हणाल्या होत्या रुपाली चाकणकर?

रुपाली चाकणकर माध्यमांशी बोलताना म्हणाल्या होत्या की, रुपाली चाकणकर या आपल्या सगळ्यांमध्ये आहेत. रुपाली चाकणकरांवरती जे विनाकारण आरोप केले गेले ते आरोप हे खोटे होते. हे प्रत्येक ठिकाणी सिद्ध केलेलं आहे आणि म्हणूनच या प्रत्येक ठिकाणी रुपाली चाकणकर लढत आहे. कारण ही महाराष्ट्राची लेक आहे. त्यामुळे खोट्या आरोपांना त्या बळी पडणार नाहीत. पण चारित्र्यावर उडणारे शिंतोडे हे 200 वर्षांपूर्वी सावित्री बाईंनी सहन केले होते. आजही ही रुपाली सावित्रीची लेक म्हणून लढत आहे. पण हे कमबॅक वैगरे होण्याचा प्रश्नच येत नाही. रुपाली चाकणकर लढताना दिसली आणि तुमच्या सगळ्यांमध्ये आहे.

Follow Us
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ आला समोर
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे मागणी
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे यांची मोठी मागणी
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाचा...
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाच्या वाढदिवसाचा व्हिडिओ व्हायरल
मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, वडेट्टीवार काय म्हणाले?
Vijay Wadettiwar : मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, अन् विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय, 17 वर्षांपासून....
Vasant Davkhare Case : 17 वर्षांपासून सुरू असलेल्या मानहानी प्रकरणाचा निकाल! उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय....
फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना...
Latur Drought : मुख्यमंत्री फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना काय दिला शब्द?
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान फडणवीसांचं
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान CM फडणवीसांचं शेतकऱ्यांना आश्वासन
मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
CM Fadnavis At Latur : मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील...
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील मुख्यमंत्र्यांना काय म्हणाले?
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन; फडणवीसांनी..
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन; फडणवीसांनी सांगितली मोठी माहिती