
20000 कोटींची संपत्ती, 170 शाही खोल्यांचा जगातील आलिशान महल असलेल्या सौंदर्यवती महाराणीने 100 वर्षांपूर्वीची साडी घातल्यावर कौतुकच नाही तर चर्चा पण झाली. बडोद्याच्या महाराणीचा हा देसी लूक अनेकांना भावला. त्यांच्या साधेपणाची चर्चा ही झाली.

डिझायनर सब्यासाची या ब्रँडला 25 वर्षे पूर्ण झाले. त्यानिमित्ताने बॉलिवूडपासून ते उद्योगविश्वातील अनेक दिग्गजांनी आयोजित कार्यक्रमाला हजेरी लावली. बडोद्याच्या गायकवाड राजघराण्यातील महाराणी राधिकाराजे गायकवाड यांच्या साधेपणाची चर्चा रंगली. त्या 100 वर्ष जुनी पैठणी नेसून आल्या होत्या.

बडोद्यातील लक्ष्मीविलास राजवाड्याच्या मालकीन राधिकाराजे गायकवाड या केवळ श्रीमंतच नही तर त्यांची सुंदरता आणि साधेपणा सुद्धा चर्चेचा विषय आहे. त्या अनेक सिनेतारकांना सुंदरतेत मात देतात.

राधिकाराजे गायकवाड यांनी या कार्यक्रमात काळ्या आणि सोनेरी काठापदराची साडी नेसली होती. तर केसांमध्ये गजरा सुद्धा माळला होता. त्यांचा हा पारंपारिक अंदाज अनेकांना भावला. काळ्या,सोनेरी नऊवारी पैठणीने त्यांच्या सौंदर्याला चार चांद लावले.

19 जुलै 1978 रोजी गुजरातमधील वांकानेर संस्थानात त्यांचा जन्म झाला. पुढे महाराज समरजीत सिंह गायकवाड यांच्यासोबत लग्न झाले. त्यांचे शिक्षण हे दिल्लीत झाले.

त्यांचे वडील डॉ. एम.के रणजीतसिंह झाला यांनी IAS होण्यासाठी राजघराण्याची बिरूदावली हटवली होती. राधिकाराजे यांनी लेडी श्रीराम महाविद्यालयातून इतिहास विषयीत पदवी मिळवली. त्यानंतर त्या काही काळ पत्रकार म्हणून कार्यरत होत्या.