Netflix वरील 6 सर्वांत वादग्रस्त चित्रपट, चौथ्यावर तर गंभीर आरोप

नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील या सात चित्रपटांवरून बराच वाद झाला होता. काहींच्या पोस्टरवरून, काहींच्या कथेवरून तर काहींच्या दृश्यांवरून प्रेक्षकांनी आक्षेप घेतला होता. हे चित्रपट कोणते आहेत, ते पाहुयात..

| Updated on: Aug 19, 2025 | 2:14 PM
1 / 7
नेटफ्लिक्सवर दर आठवड्याला नवनवे वेब सीरिज आणि चित्रपट प्रदर्शित होत असतात. त्यापैकी काही कंटेट वादग्रस्त असू शकतात. पण नेटफ्लिक्सवरील सहा सर्वाधिक वादग्रस्त चित्रपट कोणते आहेत, हे तुम्हाला माहीत आहे का?

2 / 7
क्युटीज- 2020 मध्ये हा फ्रेंच चित्रपट प्रदर्शित झाला होता. यामध्ये अल्पवयीन मुलांचा आक्षेपार्ह डान्स दाखवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. या डान्स स्टेप्समुळे चित्रपटाला टीकेला सामोरं जावं लागलं होतं. हा वाद पुढे इतका वाढला की हे प्रकरण थेट न्यायालयात पोहोचलं होतं.

3 / 7
द फर्स्ट टेम्प्टेशन ऑफ द क्राइस्ट- या चित्रपटात येशू ख्रिस्तांनाच समलैंगिक म्हणून दाखवण्यात आलं होतं. यामुळे जगभरातील ख्रिश्चनांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या.

4 / 7
द प्लॅटफॉर्म- या चित्रपटाची अनोखी संकल्पना तर प्रेक्षकांना आवडली, परंतु या भयानक आणि विचित्र तुरुंगाची कहाणी दाखवणाऱ्या चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप घेण्यात आला होता.

5 / 7
365 डेज- 2020 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. या चित्रपटात एका अशा मुलीची कथा दाखवण्यात आली आहे, जी माफियाच्या जाळ्यात अडकते आणि तो माफिया त्याच्यावर प्रेम करायला तिला 365 दिवसांचा अवधी देतो. या चित्रपटात अपहरण, बलात्कार आणि स्टॉकहोम सिंड्रोमसारख्या गोष्टींना प्रोत्साहन दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

6 / 7
द डेविल ऑल द टाइम- हा एक डार्क सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट आहे. यामध्ये दाखवण्यात आलेल्या लैंगिक शोषण, हिंदा आणि हिंसक दृष्टीकोनावर आक्षेप घेण्यात आला होता. या चित्रपटात चुकीच्या पद्धतीने धर्म दाखवल्याचा आरोप काही ख्रिश्चन धर्मीयांनी केला होता.

7 / 7
ब्लाँड- या चित्रपटात मर्लिन मुनरोच्या आयुष्याची कथा काल्पनिक रुपात दाखवण्यात आली आहे. तरी यात गर्भपात, शोषण आणि मेंटल ट्रॉमासारख्या गोष्टींना चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता.