PHOTO : जगातील सर्वाधिक मौल्यवान आणि महागडे हिरे, किंमत किती?

| Updated on: May 01, 2021 | 3:26 PM

आम्ही तुम्हाला अशाच काही दुर्मिळ आणि मौल्यवान हिऱ्यांविषयी माहिती देणार आहोत. (Most Expensive five Diamonds)

1 / 6
हिरा हा सर्व रत्नांमध्ये उत्तम मानला जातो. त्यामुळे त्याची किंमत इतर सर्वांपेक्षा जास्त असते. मात्र तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की जगात असे अनेक हिरे आहेत, ज्यांची किंमत अब्जावधी आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही दुर्मिळ आणि मौल्यवान हिऱ्यांविषयी माहिती देणार आहोत.

2 / 6
14.82 कॅरेटचा हा हिरा जगातील सर्वात मोठा नारंगी हिरा आहे. 2013 मध्ये, जिनेव्हा येथे क्रिस्टीच्या लिलावादरम्यान याचा लिलाव झाला होता. त्यावेळी हा हिरा प्रतिकॅरेट 15..6 कोटी रुपयांना विकला गेला होता. विशेष म्हणजे हा हिरा प्रति कॅरेटनुसार विकला जाणारा सर्वात महागडा हिरा ठरला होता.

3 / 6
जगातील सर्वात मोठ्या हिऱ्यांपैकी 'ग्राफ पिंक' हा एक हिरा मानला जातो. याचा लिलाव 2010 मध्ये झाला होता. त्यावेळी हा हिरा तब्बल 300 कोटी रुपयांना विकला गेला होता.  27.78 कॅरेटचा हा हिरा अतिशय चमकदार आहे. हा गुलाबी हिरा ब्रिटनच्या लॉरेन्स ग्राफ नावाच्या व्यक्तीने विकत घेतला होता. त्यांच्या नावामुळे या हिऱ्याचे नाव 'ग्राफ पिंक' असे ठेवण्यात आले होते.

4 / 6
'ब्लू मून' नावाचा हिरा 2015 मध्ये 315 कोटी रुपयांना विकला गेला. हा हिरा एका अंगठीवर बसवण्यात आला आहे. हा हिरा हाँगकाँग येथे राहणाऱ्या जोसफ लू याने आपल्या मुलीसाठी खरेदी केला होता. यानंतर त्यांनी त्यांच्या मुलीच्या नावावर हिऱ्याचे नाव 'ब्लू मून ऑफ जोसेफिन' असे ठेवले होते. हा हिरा 12.03 कॅरेटचा आहे.

5 / 6
पिंक स्टार हा हिरा जगातील सर्वात दुर्मिळ हिऱ्यांपैकी एक आहे. हा हिरा 59.6 कॅरेटचा असून तो अंडाकृती आकाराचा आहे. 2017 मध्ये हाँगकाँगमध्ये झालेल्या एका लिलावात हा गुलाबी रंगाचा हिरा विक्रमी 462 कोटी रुपयांना विकला गेला होता. त्यावेळी सर्वात महागडा हिरा म्हणून जागतिक विक्रमात याची नोंद करण्यात आली होती.

6 / 6
'ओपनहेमर ब्लू' हिरा देखील दुर्मिळ हिऱ्यांपैकी एक आहे. हा हिरा 14.62 कॅरेटचा आहे.  2016 मध्ये स्वित्झर्लंडच्या जिनेव्हा शहरातील एका लिलावात या हिऱ्याचा लिलाव केला होता. त्यावेळी त्याची सुमारे 329 कोटी रुपयांना विक्री झाली होती.