मला लग्नच करायचं नव्हतं पण ती..; मौनीबद्दल सूरज नांबियारचा खुलासा, मुलाखत व्हायरल

अभिनेत्री मौनी रॉय आणि तिचा पती सूरज नांबियार यांनी अखेर सोशल मीडियावर पोस्ट लिहित विभक्त होत असल्याचं जाहीर केलं. यादरम्यान सूरजची एक मुलाखत व्हायरल होत असून त्यामध्ये तो लग्नाला तयार नव्हता, असा खुलासा करताना दिसत आहे.

| Updated on: May 17, 2026 | 12:22 PM
1 / 5
अभिनेत्री मौनी रॉय तिच्या वैवाहिक आयुष्यातील समस्यांमुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावरील चर्चांदरम्यान मौनी आणि सूरजने अधिकृत पोस्ट लिहित चाहत्यांना विभक्त होत असल्याची माहिती दिली. यादरम्यान सूरज नांबियारची एक मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

2 / 5
सूरजने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, मौनीला त्याच्याशी लग्न करायचं होतं, पण तो लग्न पुढे ढकलत होता. बॉम्बे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सूरज म्हणाला, "मी बऱ्याच काळापासून लग्नाच्या विरोधात होतो. पण मी लग्नसंस्थेच्या विरोधात नाही. लग्न हा एक खूप शांततापूर्ण मार्ग आहे आणि मी त्याची नक्कीच शिफारस करेन."

3 / 5
मौनीबद्दल सूरज म्हणाला होता, "मौनीला नेहमीच लग्न करायचं होतं. एकतर लग्न कर किंवा मग रिलेशनशिपही नको, अशी तिची भूमिका होती. मी तिच्याकडे वेळ मागत राहिलो. मग एकेदिवशी तिने मला अंतिम इशारा दिला आणि मला वाटलं की जर मी तिच्याशी लग्न केलं नाही तर ती मला सोडून जाईल."

4 / 5
सूरजने असंही म्हटलं होतं की, ते दोघंही आपापल्या करिअरमध्ये व्यस्त असल्यामुळे त्यांचं वैवाहिक जीवन चांगलं चाललं आहे, असं त्याला वाटतं. सूरजची ही मुलाखत आता घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान व्हायरल होत आहे. सूरज लग्नासाठी तयार नव्हता, असे कमेंट्स नेटकरी करत आहेत.

5 / 5
दरम्यान मौनी आणि सूरज यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित त्यांच्याबद्दल खोट्या बातम्या पसरवू नका, अशी विनंती नेटकऱ्यांना केली आहे. या कठीण काळात तुम्ही आम्हाला एकांत द्यावा, एवढीच आमची विनंती आहे, असं त्यांनी लिहिलं आहे. जानेवारी 2022 मध्ये या दोघांनी गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग केलं होतं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us