Udayanraje Bhosale: कॉलर उडवणारे ‘राजे’ प्रेमाच्या रंगात; उदयनराजेंच्या लग्नाच्या वाढदिवसाचे खास क्षण

Udayanraje Bhosale: खासदार उदयनराजे भोसले यांच्या या कौटुंबिक रूपाचे विशेष कौतुक केले आहे. त्यांचा हा कधी न पाहिलेला अंदाज सर्वांना आवडत आहे.

| Updated on: Nov 21, 2026 | 12:41 PM
1 / 5
नेहमी आपल्या रुबाबदार आणि बेधडक शैलीसाठी ओळखले जाणारे खासदार उदयनराजे भोसले सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत. त्यांचा बेधडक अंदाज अनेकांनी पाहिला आहे पण प्रेमळ अंदाज तुम्ही कधी पाहिला आहे का? एकदा पाहाच...

नेहमी आपल्या रुबाबदार आणि बेधडक शैलीसाठी ओळखले जाणारे खासदार उदयनराजे भोसले सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत. त्यांचा बेधडक अंदाज अनेकांनी पाहिला आहे पण प्रेमळ अंदाज तुम्ही कधी पाहिला आहे का? एकदा पाहाच...

2 / 5

२० नोव्हेंबर रोजी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस असतो. त्यानिमित्ताने त्यांनी राजकीय धावपळ आणि कार्यकर्त्यांचा गराडा बाजूला सारून पत्नी छत्रपती दमयंतीराजे यांच्या सोबत खास वेळ घालवला.

3 / 5

साताऱ्यातील कास पठारावरील एका हॉटेलमध्ये खाजगी स्वरूपात हा खास दिवस साजरा केला आहे. त्यांनी पत्नी छत्रपती दमयंतीराजे यांच्यासाठी एक सुंदर गुलाबाचा बुके आणला. त्यानंतर दोघांना बसण्यासाठी एक टेबल ठेवला. अतिशय सिंपल पण आकर्षक पद्धतीने त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला आहे.

4 / 5

कोणत्याही लवाजम्याशिवाय अत्यंत साधेपणाने पार पडलेल्या या सेलिब्रेशनचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

5 / 5

नेटकऱ्यांकडून उदयनराजे भोसले यांच्या या कौटुंबिक रूपाचे विशेष कौतुक केले आहे. त्यांचा हा कधी न पाहिलेला अंदाज सर्वांना आवडत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us