
अंबानींच्या घरातील या कुत्र्यांचं नाव हॅप्पी आहे. अनंत अंबानींसोबत खास करून हा कुत्रा तुम्हाला पाहायला मिळेल. अनंत यांच्यासोबत तोसुद्धा खासगी विमानानेच प्रवास करतो.

मुंबईमधील अंबानी याचं घर असलेल्या अँटिलियामध्ये त्याच्यासाठी अनेक सुविधा उपलब्ध आहेत. हॅप्पीची देखभाल करण्यासाठी विशेष व्यवस्था केलेली आहे.

आता पार पडलेल्या विवाह सोहळ्यामध्ये अंबानी यांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला. जवळवपास हजारो कोटी रूपये खर्च केले. त्यासोबतच घरातील हॅप्पीसाठीसुद्धा त्यांनी कपड्यांची व्यवस्था केली होती.

हॅप्पी लग्नावेळी मर्सिडीज ब्रँडच्या G400D कारमध्ये बसलेला दिसला होता. ही स्पेशल कार खास त्याच्यासाठी असून या कारची किंमत 4 कोटी रूपये आहे.

राधिक आणि अनंत यांच्या लग्नातही हॅप्पील एका आलिशान कारमध्ये नेण्यात आलं होतं. अनंत अंबानी यांचा सर्वात जवळचा असून गोल्डन रिट्रीव्हर जातीचा कुत्रा आहे.