
बुधवारी हा डिफेन्स शेअर मल्टिबॅगर ठरला. आज या कंपनीचा शेअर पाच टक्क्यांनी उसळला. या शेअरला अप्पर सर्किट लागले. हा शेअर २४०.९० रुपयांवर पोहचला. काल हा शेअर २२९.४५ रुपयांवर बंद झाला होता. या शेअरचा ५२ आठवड्यातील उच्चांक ३५४.६५ रुपये तर ५२ आठवड्यातील निच्चांक १०१.०५ रुपये इतका होता.

Apollo Micro Systems Limited ही कंपनी गेल्या ४१ वर्षांपासून संरक्षण तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रात कार्यरत आहे. ही कंपनी या क्षेत्रातील दादा कंपनी मानल्या जाते. या कंपनीने गेल्या काही वर्षात मोठी झेप घेतली आहे. तीन आणि पाच वर्षात या शेअरने दीर्घ गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे.

या कंपनीचा तिमाही महसूलही चांगला होता. गेल्या वार्षिक आधारावर कंपनीचा महसूल हा २२५.२६ कोटी रुपयांवर पोहचला. त्यापूर्वी तो १६०.७१ रुपयांवर होता. कंपनीचा EBITDA ही वाढला आहे. इबिटामध्ये ८० टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. कंपनीच्या नफ्यातही मोठी वाढ झाली आहे.

ही कंपनी बीएसईमध्ये स्मॉल कॅप इंडेक्समध्ये आहे. Apollo Micro Systems Limited कंपनीचे मार्केट कॅप ८,५०० कोटी रुपयांवर पोहचले आहे. या कंपनीच्या शेअरने गेल्या तीन वर्षात ६६० टक्के तर गेल्या पाच वर्षांत १,९०० रुपयांचा परतावा दिला आहे.

ही कंपनी संरक्षण क्षेत्रात कार्यरत असून अनेक संरक्षण उत्पादनं तयार करण्यात कंपनीचा हातखंड आहे. कंपनी गेल्या ४१ वर्षांपासून कार्यरत आहे. कंपनी संरक्षण क्षेत्रातील विविध चाचणी उत्पादनं आणि इतर साहित्यांची निर्मिती करते. या कंपनीने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे.

डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.