AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दादा नाहीत, यावर विश्वासच बसत नाही… अजितदादांची काटेवाडी सुन्न; ज्येष्ठांनाही अश्रू आवरेना

Ajit Pawar Passes Away : अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेक ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. या घटनेनंतर अजितदादांची काटेवाडी सुन्न झाली आहे.

दादा नाहीत, यावर विश्वासच बसत नाही... अजितदादांची काटेवाडी सुन्न; ज्येष्ठांनाही अश्रू आवरेना
ajit pawarImage Credit source: TV 9 Marathi
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jan 28, 2026 | 7:31 PM
Share

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज बारामतीत विमान अपघातात निधन झाले आहे. सकाळी 9 च्या सुमारात बारामती विमानतळाजवळ विमान कोसळल्याने अजित पवार यांच्यासह पायलट आणि इतर सहकाऱ्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर अजित दादांच्या निधनाची बातमी संपूर्ण राज्यात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेक ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात 3 दिवस शासकीय दुखवटा जाहीर केला आहे. या घटनेनंतर अजितदादांची काटेवाडी सुन्न झाली आहे.

काटेवाडीवर शोककळा

अजित पवारांच्या बंगल्यावर आलेला एकही व्यक्ती रिकाम्या हाताने कधीच परतला नाही. मात्र सध्या त्यांच्या काटेवाडी येथील पवार बंगला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निवासस्थानाबाहेर देखील शोकाकुल वातावरण आहे .अजित पवार आपल्याला परत भेटतील या आशेने आजही अनेकजण येत आहेत. उद्या अजित पवार यांचं पार्थिव काटेवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. सकाळी 6 ते 9 पर्यंत अंत्यदर्शन घेता येणार आहे.

ज्येष्ठांनाही अश्रू आवरेना

अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. काटेवाडी गावावर अजित पवार यांचं विशेष प्रेम होतं. याच काटेवाडी गावात अजित दादा ज्यांच्या डोळ्यासमोर लहानाचे मोठे झाले ते जेष्ठ मंडळी अक्षरशः सैरभर झाले आहेत. अनेकांना अश्रु अनावर झाल्याचे पहायला मिळाले. अजित पवार आपल्यात नाहीत यावर कुणाचाही विश्वास बसत नाहीये. या गावातील प्रत्येकजण सध्या शोकसागरात बुडालेला आहे.

अजित पवारांवर अंत्यसंस्कार?

गुरुवारी सकाळी 9 वाजता गदिमा सभागृहापासून अंत्ययात्रेला सुरुवात होणार आहे. ही यात्रा विद्या प्रतिष्ठान चौक आणि भिगवण रोड सेवा रस्त्यावरून मार्गक्रमण करेल. यानंतर सकाळी 11 च्या दरम्यान विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर संपूर्ण शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. यासाठी राज्यातील सर्वच बडे नेते हजर राहणार आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासह देशातील अनेक बडे नेते उद्या बारामतीत अजित पवारांच्या अंत्यसंस्कारासाठी हजर राहणार आहेत.

Follow Us
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्री...
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्र्यांना तातडीचे आदेश
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान...
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान थेट वकीलांसह 'मातोश्री'ला जाणार
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, बंगाल...
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, नेमकं प्रकरण काय?
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठवताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट.... बंगालमध्ये राजकीय हालाचाली वाढल्या?
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर