
मुंबई उपनगरीय लोकल (Mumbai Local) आजपासून (1 फेब्रु) सर्वसामान्य नागरिकांना सुरु करण्यात आली आहे. वेळेचं बंधन ठेऊन का होईना परंतु सर्वसामान्यांसाठी मुंबई लोकल सुरु झाली आहे.

कोरोना संसर्गामुळे गेले अनेक महिने लोकल बंद होती. त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकर स्टेशनकडे फिरकले नाहीत. मात्र आजपासून सर्वसामान्यांसाठी लोकल सुरु झाल्याने सामान्य प्रवाशांसाठी दिलासा आहे. आज पहाटेपासूनच तिकीट काऊंटरवर प्रवाशांची लगबल पाहायला मिळाली.

नोकरीनिमित्त तसंच कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या प्रवासांच्या सेवेत मुंबई लोकल आजपासून दाखल झाली आहे.

दरम्यान पहिल्याच दिवशी सर्वसामान्य नागरिकांनी रेल्वे प्रवासाकडे धाव घेतली.

प्रातिनिधिक छायाचित्रं

कोरोनाचे नियम पाळत लोकल सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मात्र पहिल्याच दिवशी सोशल डिस्टंसिगचा फज्जा उडाल्याचं चित्र आहे.

मात्र अनेक महिन्यांनंतर लोकल रुळावर आल्यानं मुंबईकर सुखावले आहेत.