देव दर्शनाहून परतताना काळाचा घाला, भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू

देव दर्शनाहून परतताना जोगेश्वरीतील कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झाला आहे.

| Updated on: Sep 16, 2026 | 8:20 PM
1 / 5
महाराष्ट्रात अपघाताची मालिका सुरू आहे. महाराष्ट्रातील विविध भागात अपघाताच्या घटना घडत आहे. त्यामुळे रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.  मुंबई-नाशिक महामार्गावरील शहापूर तालुक्यातील आटगावजवळ दोन वर्षांपूर्वी जळालेल्या उभ्या ट्रकला कारने मागून जोरदार धडक दिली.

2 / 5

ट्रकला धडक दिलेलेल्या कारमधील प्रवासी हे जोगेश्वरीमधील होते. कारमधील प्रवासी हे देव दर्शनासाठी कुटुंबासह त्र्यंबकेश्वरला गेले होते. त्र्यंबकेश्वरहून परतीच्या प्रवासात आटजवळ हा भीषण झाला. या अपघाता चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर काही जण जखमी झाले.

3 / 5

मुंबई-नाशिक महामार्गावर झालेल्या अपघातात मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. तर सहा जण जखमी झाले. त्यांच्यावर शहपूर जिल्ह्यातील रुग्णालायत दाखल करण्यात आलं. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. अपघातानंतर स्थानिकांनी तातडीने धाव घेतली.

4 / 5

काहींनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतले. तर जखमींना रुग्णालयात दाखल केले.

5 / 5

अपघातानंतर पोलिसांनी रस्त्यावर झालेली वाहतूक कोंडी सुरळीत केली. या भीषण अपघातात झालेल्या चार जणांच्या मृत्यूने जोगेश्वरी परिसरात शोककळा पसरली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us