
अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने नुकतीच एक पोस्ट शेअर केलीय. या पोस्टची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. तिने काही खास फोटो शेअर केलेत.

झिम्मा 2 या सिनेमाच्या निमित्ताने रिंकूने काही फोटो शेअर केलेत. यात झिम्मा 2 ची संपूर्ण टीम दिसत आहे. या फोटोंना तिने दिलेलं कॅप्शन चर्चेत आहे.

काय बोलू मी यांच्याबद्दल, या प्रवासात मी नवीन आहे ,असं मला आजवर कधी जाणवलं नाही. या सगळ्यांसमोर मी आपली इवलुशी...पण या इवलुश्या जीवाला या सगळ्यांनी अगदी अलगदपणे सामावून घेतलं आपलंस केलं, असं म्हणत रिंकूने ही पोस्ट शेअर केलीय.

तुम्हा सर्वांकडुन खुप शिकले या प्रवासात.खुप सुंदर गोष्टी अनुभवायला मिळाल्या.या सगळ्यासाठी सगळ्यांना खुप खुप थॅंक्यु.खुप प्रेम. हेमंतदादा ढोमे थॅंक्यू तू मला ही संधी दिली..., असं रिंकूने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दोन वर्षांपूर्वी झिम्मा हा सिनेमा आला होता. या सिनेमाची प्रचंड क्रेझ होती. आता यंदा आलेला झिम्मा 2 सिनेमाही प्रचंड चर्चेत आहे. या सिनेमाने कोट्यावधींचा गल्ला जमवलाय. या सिनेमाच्या निमित्ताने रिंकूने केलेली पोस्ट सध्या चर्चेत आहे.