
नागपूरच्या येस बँकेवर फसवणुकीचा आरोप करत मनसे आज आक्रमक बनली आहे. मनसे कार्यकर्त्यांकडून एका अधिकाऱ्याला चोप देण्यात आलाय.

एका शेतकऱ्याची फसवणूक केल्याचा येस बँकेच्या नागपूर शाखेवर आरोप करण्यात आलाय. शेतकऱ्याची जेसीबी ताब्यात घेऊन तातडीने लिलाव करण्यात आला.

त्यामुळे शेतकऱ्याची मोठी फसवणूक झाल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला.

मनसे कार्यकर्ते या बँकेत घुसले. त्यांनी अधिकाऱ्याला जाब विचारला. त्यानंतर या अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली.

नागपूरमधील येस बँकेवर फसवणुकीचा आरोप करत या बँक अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली. वेळीच पोलीस दाखल झाल्याने पुढील अनर्थ टळला. त्यांनी या अधिकाऱ्याचा बचाव केला.