AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या 5 गोष्टी लक्षात ठेवा, कडक उन्हाळ्यातही कुंडीतील रोपं राहतील हिरवीगार

उन्हाळा हा केवळ आपल्यासाठीच नाही तर रोपांसाठी तसेच झाडांसाठीही आव्हानात्मक असतो. कारण वाढत्या उष्णतेच्या पाऱ्यामुळे झाडे कोमेजायला लागतात. मात्र तुम्ही जर तुमच्या झाडांची व रोपांची योग्य काळजी घेतली तर ती हिरवी राहू शकतात. ४५ अंश तापमानातही तुमची रोपे हिरवीगार ठेवण्याच्या पाच सोप्या टिप्स जाणून घेऊयात.

या 5 गोष्टी लक्षात ठेवा, कडक उन्हाळ्यातही कुंडीतील रोपं राहतील हिरवीगार
PlantImage Credit source: Google
| Edited By: | Updated on: Mar 15, 2026 | 10:25 PM
Share

उन्हाळा ऋतू सुरु झाल्याने प्रखर सूर्यप्रकाश आणि वाढत्या तापमानाचा आपल्या अंगणातील आणि बाल्कनीतील झाडांवर सर्वात जास्त परिणाम होतो. जेव्हा तापमान 40 ते 45 अंशांपर्यंत पोहोचते तेव्हा अनेक झाडे लवकर कोमेजायला लागतात, झाडांची पाने पिवळी पडतात आणि माती लवकर सुकते. या दिवसात झाडे निरोगी आणि हिरवीगार ठेवणे थोडे आव्हानात्मक होते, परंतु योग्य काळजी घेतल्यास कडक उन्हातही त्यांचे संरक्षण करता येते.

तर काही लोकांना असे वाटते की उन्हाळ्यात झाडांना त्रास होणे स्वाभाविक आहे. पण तुम्ही या दिवसांमध्ये थोडस सामान्य ज्ञान आणि योग्य बागकाम सवयी केल्यास ही समस्या मोठ्या प्रमाणात टाळता येते. आजच्या लेखात आपण कडक उन्हाळ्यातही झाडांना ताजेतवाने ठेवण्यास मदत करणाऱ्या पाच महत्त्वाच्या टिप्स जाणून घेऊयात.

मातीत ओलावा टिकून राहण्यासाठी मल्चिंग करणे

उन्हाळ्यात कुंड्यांमधील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी मल्चिंग करणे खूप फायदेशीर आहे. मल्चिंग म्हणजे घरातील कुंड्यांमधील पृष्ठभागावर कृत्रिम प्लास्टिक किंवा नैसर्गिक (पाचोळा) गोष्टींचे आच्छादन घालणे, ज्यामुळे मातीतील ओलावा टिकून राहतो आणि तण नियंत्रणात राहते. कोरडी पाने, गवत, नारळाचे साल किंवा पेंढा जमिनीवर पसरवू शकता. यामुळे माती लवकर सुकण्यापासून रोखली जाते आणि झाडांची मुळे थंड राहतात. उन्हाळ्यात ही पद्धत खूप प्रभावी आहे.

कुंडीतील माती पौष्टिक बनवा

उन्हाळ्यात झाडे मजबूत ठेवण्यासाठी, मातीत पोषक तत्वे असणे आवश्यक आहे. वेळोवेळी मातीत शेणखत किंवा गांडूळखत यासारखी सेंद्रिय खते मिक्स करत राहा. यामुळे झाडांची मुळे मजबूत होतात आणि त्यांना उष्णता चांगल्या प्रकारे सहन करण्यास मदत होते.

रोपांची नियमित तपासणी करा

उन्हाळ्यात झाडांना कीटक किंवा बुरशीजन्य समस्यांनाही जास्त बळी पडू शकतात. म्हणून वेळोवेळी झाडाची पाने आणि माती तपासा. वाळलेली किंवा खराब झालेली पाने ताबडतोब काढून टाका. यामुळे झाड निरोगी राहण्यास आणि चांगली वाढ होण्यास मदत होईल.

कुंड्यांमध्ये डब्बल पॉट ठेवणे

अति उष्णतेमध्ये, कुंड्या लवकर गरम होतात, ज्यामुळे झाड्यांच्या मुळांवर परिणाम होतो. ही समस्या टाळण्यासाठी तुम्ही कुंड्या डब्बल पोटामध्ये ठेऊ शकता किंवा ते ताग, कापड किंवा वाळलेल्या गवतावर गुंडाळू शकता. यामुळे कुंड्याचे तापमान कमी राहते आणि मुळांना जास्त गरम होण्यापासून रोखता येते.

स्प्रेने झाडांची पानं थंड करा

उन्हाळ्यात अधूनमधून झाडांच्या पानांवर हलके पाणी स्प्रे फायदेशीर ठरते. सकाळी किंवा संध्याकाळी पाण्याने स्प्रे केल्याने पानांना थंडावा मिळतो आणि त्यांना हायड्रेटेड ठेवता येते. यामुळे झाडे ताजी राहतात आणि तीव्र उष्णतेतही त्यांना कोमेजण्यापासून रोखले जाते.

Follow Us
बारामती-राहुरी पोटनिवडणूक एक्झिट पोल; नेमकं कोण जिंकणार?
बारामती-राहुरी पोटनिवडणूक एक्झिट पोल; नेमकं कोण जिंकणार?.
पश्चिम बंगालमध्ये सत्तांतराची चाहूल; ममता बॅनर्जींचा गड धोक्यात.....
पश्चिम बंगालमध्ये सत्तांतराची चाहूल; ममता बॅनर्जींचा गड धोक्यात......
तामिळनाडूत सत्तांतर नाही?; पिपल्स इन्साईटच्या एक्झिट पोलनुसार DMK....
तामिळनाडूत सत्तांतर नाही?; पिपल्स इन्साईटच्या एक्झिट पोलनुसार DMK.....
केरळमध्ये काँग्रेसची सत्ता? बंगालमध्ये ममता दीदींना धक्का!
केरळमध्ये काँग्रेसची सत्ता? बंगालमध्ये ममता दीदींना धक्का!.
ममता बॅनर्जींना जबर धक्का? पश्चिम बंगालमध्ये यंदा भाजपाची सत्ता?
ममता बॅनर्जींना जबर धक्का? पश्चिम बंगालमध्ये यंदा भाजपाची सत्ता?.
पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान, आता नेमकी कोणाची सत्ता येणार?
पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान, आता नेमकी कोणाची सत्ता येणार?.
उद्धव ठाकरे उमेदवार नसल्याने मविआत नाराजी, भाजप या नाराजीचा घेणार फायद
उद्धव ठाकरे उमेदवार नसल्याने मविआत नाराजी, भाजप या नाराजीचा घेणार फायद.
विधानपरिषदेची उमेदवारी मिळताच दानवेंचं मोठं विधान, म्हणाले मी त्यावर..
विधानपरिषदेची उमेदवारी मिळताच दानवेंचं मोठं विधान, म्हणाले मी त्यावर...
मविआचं ठरलं! ठाकरे नाही तर उमेदवार कोण? आदित्य ठाकरेंनी सांगितला अंतिम
मविआचं ठरलं! ठाकरे नाही तर उमेदवार कोण? आदित्य ठाकरेंनी सांगितला अंतिम.
आता रिक्षा चालकांना तीन महिन्यांची मुदत, मराठी न आल्यास...
आता रिक्षा चालकांना तीन महिन्यांची मुदत, मराठी न आल्यास....