
नांदेडमध्ये खुनाची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण शहर हादरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार नांदेडमध्ये दिवसाढवळ्या गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

ही घटना समोर येताच पोलिसांनी तपास करून आरोपीला ताब्यात घेतलं आहे. पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे.


नांदेड शहरातील वसरणी भागात हा धक्कादायक प्रकार घडला असून नांदेड ग्रामीण पोलिसांकडून या प्रकरणाच अधिकचा तपास केला जात आहे.