दररोज 10 लीटर दूध, काजू-बदामाचा आहार, दिमतीला 5 नोकर… बाबा घोड्याचा शाही थाट, किंमत ऐकून डोळे विस्फारतील!

नंदुरबारच्या ऐतिहासिक सारंगखेडा चेतक महोत्सवात मध्यप्रदेशातून आलेल्या 'बाबा' घोड्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. अवघ्या चार वर्षांचा असूनही ६१ इंच उंची आणि पांढराशुभ्र रंग यामुळे तो विशेष ठरला आहे.

| Edited By: | Updated on: Dec 06, 2025 | 12:28 AM
1 / 8
अश्वांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथील ऐतिहासिक चेतक महोत्सवात यंदा मध्यप्रदेशातून दाखल झालेल्या एका खास घोड्याची प्रचंड चर्चा रंगली आहे. बाबा घोडा असे या घोड्याचे नाव असून तो यंदाच्या महोत्सवातील प्रमुख आकर्षणांपैकी एक ठरला आहे.

2 / 8
विलक्षण उंची आणि देखणे रूप मध्यप्रदेशातील हा बाबा घोडा केवळ चार वर्षांचा आहे. मात्र त्याचे देखणे रूप आणि असामान्य उंची यामुळे घोडेप्रेमींची गर्दी त्याला पाहण्यासाठी जमू लागली आहे.

3 / 8
अवघ्या चार वर्षांच्या असतानाच या घोड्याची उंची ६१ इंच (सुमारे ५ फूट १ इंच) इतकी होती. कमी वयात इतकी अधिक उंची असणे हे त्याचे वैशिष्ट्य आहे. यामुळेच त्याची किंमत इतकी जास्त ठरवण्यात आली आहे.

4 / 8
याशिवाय, बाबा घोडा हा पांढराशुभ्र रंगाचा असून त्याच्या शरीरावर एकही काळा डाग नाही. ज्यामुळे त्याचे सौंदर्य अधिक खुलून दिसते आणि तो पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो.याची मत तब्बल २१ लाख रुपये असल्याची माहिती समोर आली आहे.

5 / 8
एवढ्या मौल्यवान घोड्याची निगा राखण्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. बाबा घोडाच्या देखभालीसाठी मालकाने दररोज पाच लोकांची टीम तैनात केली आहे. त्याच्या आहाराकडेही विशेष लक्ष दिले जाते.

6 / 8
या देखण्या घोड्याला रोज दहा लिटर दूध दिले जाते, तसेच त्याच्या आहारात चणे, काजू, बदाम यांसारख्या पौष्टिक पदार्थांचा समावेश असतो. दरम्यान या सारंगखेडा येथे दत्त जयंतीच्या मुहूर्तावर सुरू होणारा हा घोडेबाजार सुमारे ३५० वर्षांची जुनी परंपरा जपतो आहे.

7 / 8
एकेकाळी छत्रपती शिवाजी महाराजांनीही या ठिकाणाहून घोडे खरेदी केल्याचा इतिहास आहे. देशभरातील विविध राज्यांतून येणाऱ्या अश्वांमुळे आणि कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. या महोत्सवात बाबा घोड्याने आपल्या रुबाबदार रूपाने आणि किंमतीमुळे एक खास ओळख निर्माण केली आहे.

8 / 8
 'बाबा' घोड्याच्या रूपाने यंदाच्या चेतक महोत्सवाला एक खास झळाळी मिळाली आहे. घोडेबाजारातील उलाढालीसोबतच ऐतिहासिक परंपरेलाही यामुळे महत्त्व प्राप्त झाले आहे. हा देखणा घोडा पाहण्यासाठी घोडेप्रेमी दूरवरून येत आहेत. तसेच त्याच्या आकर्षक किंमतीमुळे त्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे.