NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा सस्पेन्स प्रचंड वाढला! खास माहितीसह बडा नेता फडणवीसांच्या भेटीला, पडद्यामागे घडामोडींना वेग

| Updated on: Nov 09, 2026 | 8:18 PM
1 / 5
दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची सध्या खूपच चर्चा रंगलीय. शरद पवार-पार्थ पवार यांच्यात दोन वेळा बैठक झाली. शरद पवार-प्रफुल्ल पटेल यांचीही भेट झाली. त्यामुळेच विलीनीकरणाच्या चर्चेने जोर धरलाय.

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची सध्या खूपच चर्चा रंगलीय. शरद पवार-पार्थ पवार यांच्यात दोन वेळा बैठक झाली. शरद पवार-प्रफुल्ल पटेल यांचीही भेट झाली. त्यामुळेच विलीनीकरणाच्या चर्चेने जोर धरलाय.

2 / 5

शरद पवार यांच्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी विलीनीकरणाचा विषय संपला आहे, असं सूत्रांना सांगितलंय. त्यामुळे आता विलीनीकरण होणार नाही, असं बोललं जातंय. असं असलं तरीही महत्त्वाचा नेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचला आहे.

3 / 5

समोर आलेल्या माहितीनुसार दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते संजय काकडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. या भेटीत राष्ट्रवादीत सुरू असलेल्या घडामोडींवर चर्चा झाली आहे.

4 / 5

शिवाय देवेंद्र फडणवीस आणि संजय काकडे यांच्यात इतर राजकीय घडामोडींवरदेखील चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली आहे. मुंबईत ही भेट झाली आहे.

5 / 5

दरम्यान, फडणवीस आणि संजय काकडे यांच्यात नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, हे अद्याप समोर आलेले नाही. परंतु आगामी काळात नेमकं काय होणार, याबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लावले जातायत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us