National Awards: शाहरुख किंवा आमीर नाही, तर या 5 अभिनेत्यांकडे आहेत सर्वाधिक राष्ट्रीय पुरस्कार, पहिला नंबर कोणाचा ?

Top 5 National Award Winner: भारतीय चित्रपटसृष्टीत एकाहून एक अभिनेते आहेत ज्यांनी त्यांच्या अभिनयाच्या बळावर चाहत्यांच्या हृदयात स्थान मिळवले आहे. चांगली भूमिका करणाऱ्या नटाला किंवा नटीला राष्ट्रीय पुरस्काराने गौरवले जाते. राष्ट्रीय पुरस्कार आपल्यासाठी ऑस्करहून कमी नाही. तुम्हाला माहिती आहे का सर्वाधिक राष्ट्रीय पुरस्कार विजते 5 अभिनेते कोण आहेत ?

| Updated on: Mar 01, 2026 | 8:14 PM
1 / 6
 फिल्म इंडस्ट्रीत एकाहून एक अभिनेते आहेत, मग बॉलीवूड असो की साऊथ फिल्म इंडस्ट्री अनेक अभिनेत्यांनी भारताचे नाव जगभरात गाजवले आहे. या यादीत दिलीप कुमार ते सलमान खान आणि आमीर खान तसेच शाहुरुख खान यांचा समावेश आहे. परंतू सर्वाधिक नॅशनल पुरस्कार कोणाला मिळाले आहेत हे तुम्हाला माहिती आहेत का ?

फिल्म इंडस्ट्रीत एकाहून एक अभिनेते आहेत, मग बॉलीवूड असो की साऊथ फिल्म इंडस्ट्री अनेक अभिनेत्यांनी भारताचे नाव जगभरात गाजवले आहे. या यादीत दिलीप कुमार ते सलमान खान आणि आमीर खान तसेच शाहुरुख खान यांचा समावेश आहे. परंतू सर्वाधिक नॅशनल पुरस्कार कोणाला मिळाले आहेत हे तुम्हाला माहिती आहेत का ?

2 / 6

अमिताभ बच्चन यांना महानायक म्हटले जाते. त्यांनी सहा दशकाहून अधिक काळ कमालीचा अभिनय केला असून जगभरात त्यांचे नाव आदराने घेतले जाते. त्यांनी अनेक पुरस्कार पटकावले आहेत. सर्वाधिक राष्ट्रीय पुरस्कार जिंकणारे ते अभिनेते आहेत. त्यांना अग्निपथ, ब्लॅक, पा आणि पिकू सारख्या चित्रपटातील अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरवले आहे.

3 / 6

कमल हासन देखील पाच दशकाहून अधिक वर्षे इंडस्ट्रीत आहेत.त्यांना जगभरात अनेक पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. त्यांना उत्कृष्ठ अभिनयासाठी चार राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. एक राष्ट्रीय पुरस्कार Kalathur Kannamma (Debut film) उत्कृष्ठ बाल कलाकार म्हणून मिळाला आहे. त्यांना मुंदरम पिरई, नायकन, इंडियन चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे.

4 / 6

मामूट्टी साऊथ फिल्म इंडस्ट्रीचे व्हर्सेटाईल अभिनेते आहेत. त्यांना तीन वेळा अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. मामुट्टी यांनी माथीलुकल, विधेयन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटासाठी नॅशनल अवॉर्ड मिळाले आहे.

5 / 6

अजय देवगण फिल्म इंडस्ट्रीचे संयत अभिनयासाठी ओळखले जाणारे अभिनेते आहेत.विशेष म्हणजे त्यांनी एक्शन चित्रपटातून करियरची सुरुवात केली होती. नंतर त्यांनी संयत अभिनयातही बाजी मारली. रोमान्स पासून ते कॉमेडीपर्यंत अनेक प्रकारच्या त्यांच्या भूमिका गाजल्या आहेत. त्यांनी तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. जख्म, द लिजंड ऑफर भगत सिंह, तान्हाजी अशा तीन चित्रपटांसाठी नॅशनल अवॉर्ड मिळाले आहे.

6 / 6

साऊथ इंडियन अभिनेते प्रकाश राज यांना तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. बेस्ट एक्टर, बेस्ट सपोर्टिंग एक्टर आणि एक स्पेशल ज्युरी असे मिळून तीन राष्ट्रीय पुरस्कार प्रकाश राज यांना मिळाले आहेत. कांचीवरम, इरुवर, अनंथापुरम या चित्रपटांसाठी हा पुरस्कार मिळाला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us