
'ईयरबड्स' ही हल्ली दररोजच्या वापरातील गरजेची वस्तू होऊ लागली आहे. कुठेही बाहेर जाताना आपण मोबाईलसोबतच ईयरबड्स नक्कीच घेतो. प्रवास सिनेमा पाहायचा असेल किंवा गाणी ऐकायची असतील तर ईयरबड्स उपयोगी ठरतात.

पण हे ईयरबड्स सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे असतात का? अनेकदा ते सामान्य माणसाच्या खिशाला परवडणारे नसतात. त्यामुळे ते घेणं आपण टाळतो. पण आता तुमच्या खिशाला परवडणारे आणि हटके डिझाइन असणारे ईयरबड्स लॉन्च झाले आहेत.

प्रोमेटने नथिंग ईयरबड्स लॉन्च केलेत. याची किंमत दोन हजारांच्या आत आहे. या ईयरबड्सचं डिझाइन खास आहे. हे ईयरबड्स ट्रान्सफरंट आहेत. शिवाय वेगवेगळ्या रंगांमध्ये ते उपलब्ध आहेत. ब्लॅक, ब्लू, व्हाईट, पिंक, या रंगामध्ये हे ईयरबड्स उपलब्ध आहेत.

प्रोमेटने नथिंगच्या नव्या ईयरबड्सचं नाव TransPod ठेवलं आहे. हे ईयरबड्स 26 तासांपेक्षा जास्त प्लेबॅक टाइम देतो. ब्लूटूथ कॉलिंग आणि लीक ट्रांसपेरंच डिझाइन ही या ईयरबड्सची वैशिष्ट्ये आहेत.

10 मीटर अंतरापर्यंतची कनेक्टिविटी या ईयरबड्सला आहे. एक्टिव न्वॉइज कॅन्सिलेशन फिचर देखील या ईयरबड्समध्ये आहे. 1999 रुपयांमध्ये तुम्ही हे ईयरबड्स खरेदी करू शकता. दोन वर्षांची वॉरंटी या ईयरबड्सला आहे.