PHOTO | जंगलसफारी आणि निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी उत्तम पर्याय शोधताय?, मग ‘या’ ठिकाणाला नक्की भेट द्या

वर्धा जिल्ह्याच्या मुख्यालयापासून 40 किमी आणि नागपूरपासून 65 किमी अंतरावर बोर व्याघ्र प्रकल्प आहे (bor wildlife sanctuary information)

| Updated on: Dec 27, 2020 | 4:49 PM
1 / 4
जंगल, कडे-कपाऱ्या फिरणे आवडणाऱ्या पर्यटकांसाठी वर्धा जिल्ह्यातील  बोर व्याघ्र प्रकल्प हा एक उत्तम पर्याय आहे. बोर व्याघ्र प्रकल्प  वर्धा जिल्ह्याच्या मुख्यालयापासून 40 किमी आणि नागपूरपासून 65 किमी अंतरावर आहे.

2 / 4
बोर अभयारण्यात व्याघ्रदर्शनासह अनेक वन्यप्राण्यांचे दर्शन होते. जंगली प्राणी जसे वाघ, कोल्हे, कुत्रे, अस्वल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत. या अभयारण्यात मोरही मुबलक प्रमाणात आहेत.

3 / 4
जंगल सफारीकरिता या ठिकाणी 16 जिप्सी गाड्या उपलब्ध असून 25 गाईड आहेत. येथील वनवैभव बघण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. पर्यटकांनी येथे येण्यापूर्वी http://www.mahaecotourism.gov.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन बुकिंग करणे आवश्यक आहे. येथे येण्यासाठी फ्कत ऑफलाईन पद्धतीनेच बुकिंग करता येते. ऑफलाईन पद्धतीने तिकीट बूक करण्याची इथे सुविधा नाही.

4 / 4
बोर व्याघ्र प्रकल्पासोबतच येथे बोर धरण, स्तुप, छोटे पार्कदेखील आहेत. येथील परिसरही निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. पर्यटकांना हा परिसरही निसर्गसौंदर्याचा आनंद देणारा आहे.