Rahul Gandhi Chhatron Ki Goonj : राहुल गांधींना छत्रपती शिवाजी महाराजांची मुर्ती भेट देण्यासाठी आलेला मुस्लिम तरुण कोण?

Rahul Gandhi Chhatron Ki Goonj : काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज पुण्यात आले आहेत. 'छात्रो की गुंज' कार्यक्रमाद्वारे ते विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. राहुल गांधींच्या या कार्यक्रमाबद्दल विद्यार्थी वर्गात मोठी उत्सुक्ता आहे.

| Edited By: | Updated on: Aug 22, 2026 | 5:06 PM
1 / 5
काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज पुण्यात आले आहेत. 'छात्रो की गुंज' कार्यक्रमाद्वारे ते विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. राहुल गांधींच्या या कार्यक्रमाबद्दल विद्यार्थी वर्गात मोठी उत्सुक्ता आहे.

काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज पुण्यात आले आहेत. 'छात्रो की गुंज' कार्यक्रमाद्वारे ते विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. राहुल गांधींच्या या कार्यक्रमाबद्दल विद्यार्थी वर्गात मोठी उत्सुक्ता आहे.

2 / 5

राहुल गांधी पुण्यात आहे. ते विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. जेन झीं चा सहभाग त्यांच्या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात असणार आहे. यावरुन आता राजकारणही सुरु झालं आहे. काँग्रेस नेत्यांच्या कॉलेजमधील मुलांना या कार्यक्रमांना खास बोलवण्यात आलय असा भाजपचा आरोप आहे.

3 / 5

दरम्यान या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये एका मुस्लिम तरुणाने लक्ष वेधून घेतलं. हा मुस्लिम तरुण राहुल गांधींना छत्रपती शिवाजी महाराजांची मुर्ती भेट देण्यासाठी आला आहे.

4 / 5

या तरुणाचं नाव मुद्दसिर खान आहे. आमचे भाऊ मोहसीन भाई शेख, तस्लीम हसीन शेख यांच्यासोबत मी राहुल गांधींना छत्रपती शिवाजी महाराजांची मुर्ती द्यायला आलोय. मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे. राहुल गांधींना भेटायचं आहे. बऱ्याच वर्षांपासून काँग्रेसमध्ये असल्याचं त्याने सांगितलं.

5 / 5

नीटचा मुद्दा आहे. राहुल गांधी अमित शाहंचा राजीनामा मागतायत. यावर मुद्दसिर बोलला की, "युवांसाठी काहीतरी त्यांनी चांगलं केलं आहे. नीट पेपर लीक मोठा मुद्दा होता. राहुल गांधी यांनी विषय लावून धरल्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांना शिक्षण मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला" "विद्यार्थ्यांसाठी चांगलं काम करतायत ते. राहुल गांधींना भेटण्यासाठी मी थांबलो आहे" असं मुद्दसिर खान यांनी सांगितंल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us