
पाकिस्तान भारताविरोधात नेमहीच काहीतरी कुरापत्या करत असतो. ऑपरेशन सिंदूरनंतरही पाकिस्तानच्या भूमिकेत अद्याप बदल झालेला नाही. असे असतानाच आता पाकिस्तानातून एक मोठी आणि महत्त्वाची माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानची काही विमानं शस्त्र आणण्यासाठी थेट चीनमध्ये गेली होती. या विमानांत एअरक्राफ्ट मिसाईल्स आणि अन्य शस्त्र पाकिस्तानात नेण्यात आलेल्याचे बोलले जात आहे.

भारताने हल्ले केलाच तर उत्तरादाखल आपण तयार असावे, असा हेतू या कथितपणे शस्त्रास्त्र खरेदीमागे असल्याचे बोलले जात आहे. पाकिस्तानी वायूसेनेची Il-78 ही व रिफ्यूलिंग विमाने चीनमधून जाऊन आल्याचे बोलले जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार ही विमाने चीनच्या सिचुआन प्रांतातील एका एअरबेसवर उतरली होती. त्यामुळेच चीनमधून पाकिस्तानाल कोणती शस्त्र देण्यात आली? असा सवाल उपस्थित केला जात आहे. चीनने पाकिस्तानी लढाऊ विमानांतून वाहतूक करता येतील अशा मिसाईल्स दिल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पाकिस्तानच्या J-10C फाइटर जेटसाठी लांब अंतरावर हवाई हल्ला करण्याची क्षमता असणारी क्षेपणास्त्रे तसेच YJ-21 हायपरसोनिक अँटीशिप मिसाईल्सही दिल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता भविष्यात काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.