
लहानपणापासून आपल्या हातावर विविध रेषा पाहायला मिळतात. या रेषा फक्त दिसण्यासाठी नव्हे तर आपले भविष्य आणि नशिबाचे अनेक गूढ संकेत देतात. हस्तरेखा शास्त्रानुसार, आपल्या तळहातावरील रेषांवरून धन, भाग्य, पराक्रम, बुद्धिमत्ता आणि वैवाहिक जीवनाबद्दल अनेक गोष्टी आपल्याला कळू शकतात.

जर तुमच्या तळहातावर स्पष्ट, खोल आणि सरळ धन रेखा (Money Line) असेल आणि त्याचबरोबर मनगटापासून थेट मधल्या बोटाखाली भागापर्यंत जाणारी भाग्य रेखा असेल, तर हे तुमच्या आयुष्यात आर्थिक यश मिळवण्याचे आणि करोडपती बनण्याचे मोठे संकेत असू शकतात.

महाराष्ट्रातील एका प्रतिष्ठित ज्योतिषाचार्य यांच्या मते, हस्तरेखा शास्त्रानुसार तळहातावरील रेषा आपल्या नशिबाचे आणि भविष्याचे अनेक रहस्य उलगडतात. यात धन रेखा आणि भाग्य रेखा अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जातात, ज्या व्यक्तीच्या आर्थिक स्थिती आणि यशाचे सूचक आहेत.

धन रेखा तळहाताच्या मध्यातून वरच्या दिशेने जाते. स्त्रियांसाठी उजव्या हाताची, तर पुरुषांसाठी डाव्या हाताची धन रेखा पाहिली जाते. ही रेषा खोल, लांब आणि न तुटलेली तसेच तळहाताला दोन स्पष्ट भागांमध्ये विभागणारी असेल, तर ते कायमस्वरूपी धनप्राप्तीचे संकेत देते.

याउलट, धन रेखा वाकडी-तिकडी, मध्येच तुटलेली किंवा तिला अनेक छोट्या उप-शाखा असतील, तर अशा व्यक्तीला पैशाची चणचण, उत्पन्नाची अनिश्चितता आणि वारंवार आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो.

त्याचप्रमाणे भाग्य रेखा मनगटापासून सुरू होऊन मधल्या बोटाखालील भागापर्यंत जाते. जर ही रेषा लांब, खोल आणि सरळ असेल आणि शनि पर्वतावर जाऊन ती दोन शाखांमध्ये विभागली जात असेल तर असे लोक कमी मेहनतीत नशिबाच्या जोरावर मोठे यश मिळवतात. अशाप्रकारच्या हस्तरेषा असणाऱ्या लोकांना समाजात उच्च स्थान, मान-सन्मान आणि धन मिळते. तसेच लग्नानंतर त्यांच्या आर्थिक स्थितीत विशेष वाढ दिसून येते.

समृद्धी केवळ हाताच्या रेषांमध्ये नसते, तर आपल्या कर्म आणि विचारांमध्येही ती दडलेली असते. हस्तरेखा शास्त्रानुसार वेळ, ग्रहांची स्थिती आणि आपल्या वैयक्तिक कर्मानुसार हाताच्या रेषा बदलू शकतात. त्यामुळे, जर तुमच्या हातातील रेषा सध्या कमकुवत दिसत असतील, तरी चांगली कामे, सकारात्मक विचार आणि योग्य उपाययोजना करून त्यात बदल घडवता येतो. हे सहज शक्य आहे.

तुमच्या तळहातात करोडपती होण्याचं रहस्य आहे आणि जर ते नसेल तर तुम्ही रोज श्रीसूक्त आणि कनकधारा स्तोत्राचे पठण करणे आवश्यक आहे. तसेच शुक्रवारी पांढरे कपडे घालून लक्ष्मी मातेची पूजा करणे आणि दररोज ५ व्यक्तींना अन्न किंवा पाणी दान करावे, यातून तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळतात.

भाग्य रेखा प्रत्येकाच्या हातात असली तरी तिची स्पष्टता आणि दिशा वेगवेगळी असू शकते. धन रेखा आणि जीवन रेखा वेगळ्या असतात. जीवन रेखा अंगठ्याच्या खाली असते, तर धन रेखा तळहाताच्या मध्यभागी असते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हाताच्या रेषा वेळानुसार बदलू शकतात. त्यामुळे प्रत्येकाने चांगले कर्म करत राहावे. तसेच योग्य उपाय आणि सकारात्मक विचारांनी त्यात बदल घडवणे शक्य आहे.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)