
अभिनेत्री परिणीती चोप्राचा सायना हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसतंय. चाहत्यांकडूनही या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतोय. परिणितीचं या चित्रपटातील कामगिरी बघून सगळ्यांना आनंद झाला आहे.

परिणीतीने या विशेष चित्रपटासाठी संपूर्ण दोन वर्षे प्रशिक्षण घेतलं आहे. तिने स्वत:ला बॅडमिंटन खेळण्यातही तज्ज्ञ बनवलं आहे आणि तिच्या लूकवरही तिनं बरंच कामं केलं आहे.

आता त्या मेहनतीचे बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. परिणीतीने हे फोटो शेअर केले आणि तिने सायना नेहबवालच्या भूमिकेत स्वत:ला कसं जोडले ते सांगितलं आहे.

परिणीतीनं अनेक व्हिडीओही शेअर केले आहेत, ज्यामधून स्पष्ट अंदाज लावता येऊ शकतो की तिनं या चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. परिणीतीनं दिवसातील अनेक तास बॅडमिंटन खेळण्याचा सराव केला आहे.

त्याचबरोबर अनेक फोटो देखील समोर आली आहेत ज्यामध्ये ती खूप थकलेली दिसत आहे. सशक्त प्रशिक्षणानंतर, ती बॅन्डमिंटन कोर्टात बसलेली काही फोटो ट्रेंडिंग आहेत. त्या फोटोंमध्ये तिचा लूक अगदी सायना नेहवालसारखा दिसत आहे.

परिणितीनं एक खास फोटोही शेअर केला आहे. या फोटोमध्ये अभिनेत्री स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालसोबत पोज देताना दिसत आहे. सर्व चाहते या फोटोवर आपली प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

हे फोटो तिनं तिच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवर शेअर केले आहेत.