दूषित पाणी प्यायल्याने या शहरात लोकांचा थेट मृत्यू, दूषित पाणी ओळखायचे कसे? जाणून घ्या..

दूषित पाणी पिल्याने आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. नुकताच एक अत्यंत धक्कादायक घटना घडली असून दूषित पाणी पिल्याने काही लोकांचा मृत्यू,झाला. ज्यानंतर एकच मोठी खळबळ उडाली आहे.

| Updated on: Jan 02, 2026 | 11:54 AM
1 / 5
इंदौरच्या भागीरथपुरा परिसरात थेट दूषित पाणी पिल्याने लोक आजारी पडले असून काहींचा थेट मृत्यू झाला घटनेने देशभरात मोठी खळबळ उडाली असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. लोकांना जुलाब आणि उलटीची समस्याही आहे. 

इंदौरच्या भागीरथपुरा परिसरात थेट दूषित पाणी पिल्याने लोक आजारी पडले असून काहींचा थेट मृत्यू झाला घटनेने देशभरात मोठी खळबळ उडाली असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. लोकांना जुलाब आणि उलटीची समस्याही आहे. 

2 / 5

दूषित पाणी पिल्याने मृत्यू झालेल्या लोकांना नातेवाईकांना सरकारकडून 2 लाखाची मदत करण्यात आली. तपासात हे स्पष्ट झाले की, दूषित पाणी पिल्यामुळेच या लोकांचा मृत्यू झाला आहे. 

3 / 5

ज्या परिसरात ही घटना घडली, त्या ठिकाणी सुमारे 15,000 लोक राहतात. दूषित पाणीपुरवठ्यामुळे दिवसभर महिला आणि मुलांसह नवीन रुग्ण समोर येत राहिले. त्यानंतर काहींची तब्येत इतकी खालावली की, थेट त्यांचा मृत्यू झाला. 

4 / 5

प्रशासनाकडून लोकांना पाणी गरम करून पिण्याचा सल्ला देण्यात आला. महानगरपालिका पथकाने भागीरथपुरा येथील पाणीपुरवठा वाहिनीचा नकाशा तयार करून तपास सुरू केला, ज्यात मुख्य वाहिनीजवळ पाणी दूषित झाल्याचे निष्पन्न झाले. 

5 / 5

एम्स गोरखपूरचे डॉ. रजनीश कुमार यांनी म्हटले की, दूषित पाण्यामध्ये जीवाणू, विषाणू असतात, जे थेट आतड्यांवर हल्ला करतात. यामुळे वारंवार जुलाब होतात आणि उलटी होते. कायम लक्षात ठेवा की, दूषित पाणी हे गडूळ रंगाचे असते, ते स्वच्छ नसते. थोडी माती मिक्स केल्यासारखे दिसते. 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us