
नारळ पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. नारळ पाणी पिल्याने लगेचच एनर्जी मिळते. त्याशिवाय शरीरासाठी फायदेशीर अनेक महत्वाचे घटक देखील नारळ पाण्यात असतात. मात्र, नारळ पाणी पिणे काही लोकांसाठी अत्यंत घातक आहे. त्यांनी नारळ पाणी पिले तर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. चला तर मग कोणत्या लोकांनी नारळ पाणी पिणे टाळाले हे जाणून घेऊयात.

नारळ पाण्यात मोठ्या प्रमाणात पोटॅशियम असते. जर तुम्हाला किडनीची संबंधित काही आजार असेल तर मग नारळ पाणी पिणे टाळाच. यामुळे हायपरक्लेमिया होऊ शकतो. यामुळे किडनीशी संबंधित आजार असलेल्यांनी नारळ पाणी पिणे टाळा.

नारळ पाण्यामुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होते. मात्र, ज्या लोकांना रक्तदाबाची समस्या आहे, अशांनी नारळ पाणी पिऊ नये. जर त्यांनी नारळ पाणी पिले तर अशक्तपणा आणि चक्कर देखील येऊ शकते.

शस्त्रक्रियेदरम्यान शरीराचा रक्तदाब संतुलित ठेवणे महत्वाचे आहे. यामुळे शस्त्रक्रियेच्या अगोदर आणि नंतरही नारळ पाणी पिताना दहावेळा विचार करणे आवश्यक आहे.

बाकी तुम्हाला काही इतर समस्या असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने नारळ पाणी प्या. बऱ्याचदा आजारी पडल्यानंतर डॉक्टर रूग्णांना नारळपाणी पिण्याचा सल्ला देताना दिसतात.