
मधुमेह (Diabetes) असलेल्या लोकांनी कधीच गरम पाण्याचा शेक घेऊ नये. त्यांच्यात पायातील संवेदना कमी (Neuropathy) असू शकते. त्यामुळे पाणी जास्त गरम झाले तरी कळत नाही, आणि भाजण्याची शक्यता वाढते.

पायात किंवा पोटऱ्यांत रक्तप्रवाह कमी असणाऱ्या लोकांना देखील गरम पाण्याचा शेक घेऊ नये... अशा व्यक्तींना गरम पाण्यामुळे त्वचेला हानी किंवा जखम होऊ शकते. रक्तप्रवाहात अचानक बदल होऊन वेदना किंवा सूज वाढू शकते.

त्वचेचे आजार, जखमा, फोड असलेल्या व्यक्तींनी देखील गरम पाण्याची शेक घेऊ नये. ज्यामुळे जखमा भाजू शकतात आणि इन्फेक्शन वाढू शकते. विशेषतः एक्झिमा, सोरायसिस किंवा फंगल इन्फेक्शन असणाऱ्यांनी काळजी घ्यावी.

गर्भवती महिलांनी देखील पाण्याचा शेक घेऊ नये... गर्भवती महिलांनी पाण्यात पाय शेकवणं टाळलं पाहिजे... कारण याचा रक्तदाबावर परिणाम होऊ शकतो आणि शरीरात उष्णता वाढण्याचा धोका निर्माण होतो.

उच्च रक्तदाब (High BP) असलेल्या लोकांनी देखील गरम पाण्याचा शेक घेऊ नये. एवढंच नाही तर, गरम पाण्यामुळे हृदयावर ताण येऊ शकतो. रक्तप्रवाह आणि हृदयगतीत अनियंत्रित बदल होऊ शकतात. (टीप: हा लेख फक्त माहितीसाठी आहे. वरील उपचार करण्यापूर्वी, तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)