

महत्वाचं म्हणजे मंजरी फडणीस या चित्रपटात हॉरर भूमिका साकारताना दिसणार आहे.

जून 2021 मध्ये महाराष्ट्रातील सर्व चित्रपट गृहात हा चित्रपट रिलीज होणार आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर लाल आणि सुमारे 90 लोकांचा ग्रुप सध्या उत्तराखंडच्या थंडीत चित्रपटाचं शूटिंग करत आहेत.

पुष्कर आणि मंजरी शुटिंगदरम्यान धमाल करताना दिसत आहेत.

या चित्रपटात मंजरी फडणीस, पुष्कर जोग, सौरव गोखले, अजय कुमार सिंग, उषा नाडकर्णी आणि आनंद जोग खास भूमिकेत झळकणार आहेत.