कामाच्या तणावातून ब्रेक घ्यायचाय? 3 दिवसांत ‘या’ ठिकाणी सोलो ट्रिप करून व्हाल फ्रेश!

| Updated on: Feb 06, 2024 | 3:01 PM

कामाचा तणाव प्रत्येकालाच असतो. मात्र त्यातून शॉर्ट ब्रेक घेऊन ट्रिपवर गेल्यास हा तणाव क्षणार्धात दूर होऊ शकतो. सोलो ट्रिपचीही एक वेगळीच मज्जा आहे. देशभरात अशी अनेक ठिकाणं आहेत, जिथे तुम्ही एकटेच फिरण्याचा आनंद घेऊ शकता.

1 / 5
कामाचा तणाव किंवा जबाबदाऱ्यांचं ओझं सांभाळताना अनेकदा स्वत:साठी वेळच मिळत नाही. सध्याच्या घडीला प्रत्येकाचं आयुष्य अत्यंत व्यस्त झालं आहे. या व्यस्त आयुष्यातून जर तुम्ही ब्रेक घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही सोलो ट्रिपवर जाऊ शकता. भारतात अशी अनेक ठिकाणं आहेत, जिथे तुम्ही दोन ते तीन दिवसांत फिरून येऊ शकता.

2 / 5
हरिद्वार-ऋषिकेश- ही दोन्ही ठिकाणं फक्त अध्यात्मिक गोष्टींसाठीच नव्हे तर अॅडव्हेंचरसाठीही प्रसिद्ध आहेत. विशेष म्हणजे स्वस्तात रेल्वे तिकिट घेऊन तुम्ही या ठिकाणी कमी किंमतीत चांगल्या हॉटेलमध्ये राहू शकता. गंगा किनारी केली जाणारी गंगा आरती आणि पर्वतांमधून होणारा प्रवास यांची गोष्टच निराळी आहे. ऋषिकेशला तुम्ही रिव्हर राफ्टींग, बंजी जंपिंग, जाएंट स्विंगसुद्धा करू शकता.

3 / 5
जयपूर- गुलाबी शहर म्हणून ओळखलं जाणारं जयपूर हे कपल, ग्रुप आणि सोलो अशा सर्व प्रकारच्या ट्रिपसाठी ऑल टाइम लोकप्रिय डेस्टिनेशन आहे. इथला शाही थाट, संस्कृती आणि पाहुणाचार पाहून तुम्ही जयपूरच्या प्रेमात पडाल.

4 / 5
धर्मशाळा, हिमाचल- पर्वतरांगा आणि हिरवळीने समृद्ध असलेली धर्मशाळा ही जागा सोलो ट्रिपसाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. इथला निसर्ग, वातावरण तुम्हाला क्षणार्धात ताजंतवानं करतं. याठिकाणी वर्षभर पर्यटकांची ये-जा असते. इथली प्रत्येक जागा पिक्चर-परफेक्ट आहे.

5 / 5
मुन्नार, केरळ- या जागेला जरी भारतातील हनिमून डेस्टिनेशन मानलं जात असलं तरी याठिकाणी सोलो ट्रिप करण्याची गोष्टच निराळी आहे. चहाचे मळे, हिरवळ, निसर्ग पाहून तुम्ही  मुन्नारच्या प्रेमात पडाल.