PM Kisan Yojana:कोट्यवधी शेतकऱ्यांना आनंदवार्ता, या दिवशी येणार 22 वा हप्ता
PM Kisan Yojana 22nd installment: पंतप्रधान शेतकरी किसान योजनेविषयी मोठी अपडेट समोर आली आहे. देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या दिवशी त्यांच्या बँक खात्यात 22 वा हप्ता जमा होणार आहे.

PM Kisan Yojana 22nd installment: पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या कोट्यवधी शेतकर्यांना सध्या 22 व्या हप्त्याची प्रतिक्षा आहे. या योजनेतंर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते. 2,000 रुपये दर चार महिन्याला शेतकर्यांच्या खात्यात जमा होतात.

केंद्र सरकारने यापूर्वी 21 वा हप्ता शेतकर्यांच्या खात्यात जमा केला आहे. नोव्हेंबर 2025 रोजी हा हप्ता जमा करण्यात आला होता. पण अद्याप 22 व्या हप्त्याची कोणताही घोषणा करण्यात आलेली नाही. पण या महिन्यात अखेरीस अथवा पुढील महिन्याच्या सुरुवातीला अथवा मध्यात हा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे.

पीएम किसान योजनेचा हप्ता प्राप्त करण्यासाठी eKYC करण्याची गरज आहे. ओटीपी, बायोमॅट्रिक वा फेस ऑथेंटिकेशनद्वारे शेतकऱ्यांना ईकेवायसीची प्रक्रिया पूर्ण करता येईल. यावेळी केवळी ईकेवायसीची नाही तर शेतकऱ्यांना फार्मर आयडी नोंदवणे आवश्यक आहे.

उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, तामिळनाडू, तेलंगणा आणि इतर राज्यातील शेतकऱ्यांना विना Farmer ID शिवाय PM Kisan योजनेसाठी शेतकरी पात्र नसतील. या राज्यात फार्मर आयडी तयार करण्यासाठी शिबिर आयोजित करण्यात आले आहेत. यासह इतर केंद्रावर फार्मर आयडी काढण्याची सुविधा देण्यात आली आहे.

अल्पभूधारक शेतकऱ्यांसह बटाईदारांनाही या योजनेचा लाभ देण्यात येणार अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. पण या योजनेत अशी कोणतीही तरतूद नाही. सध्या पात्र अल्पभूधारक शेतकर्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे. ज्यांच्या नावे महसूल दप्तरी जमिनीची नोंद आहे. त्यामुळे बटाईदारांना सध्या या योजनेचा लाभ मिळत नाही.

ज्या शेतकऱ्यांनी eKYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. ज्यांनी भू-सत्यापनाची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. अथवा अर्धवट ठेवली आहे. बँक खात्याचा चुकीचा तपशील दिला आहे. बँकेचा IFSC कोड चुकीचा टाकला आहे. शेतकर्याच्या नावाचे स्पेलिंग चुकीचे आहे. आधार क्रमांक चुकीचा टाकला आहे, त्यांना 22 वा हप्ता मिळणार नाही.