
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा 14 वा हफ्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. मात्र 7 दिवसांच्या प्रतिक्षेनंतरही काही लाभार्थ्यांचा खात्यात ही रक्कम आलेली नाही.

हफ्त्याची रक्कम न आल्याने हैराण होण्याची गरज नाही. लाभार्थी घरबसल्या 14 व्या हफ्त्याचं स्टेटस जाणून घेऊ शकतात. त्यासाठी pmkisan.gov.in या वेबसाईटवर लॉगीन करावं लागेल. त्यानंतर Know Your Status या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर नोंदणीकृत क्रमांक आणि कॅप्चा कोड टाका.

PM Kisan Samman Nidhi news in marathi

तसेच केंद्र सरकारने या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ई केवायसी बंधनकारक केलंय. लाभार्थ्यांनी ई केवायसी केली नसल्यास 14 वा हफ्ता मिळणार नाही. तुम्ही ई केवायसी किंवा इतर आवश्यक बाबींची पूर्तता केली असेल, तर तुमच्या खात्यात 14 व्या हफ्त्याची रक्कम जमा होईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 जुलै रोजी राजस्थानमधील एका कार्यक्रमादरम्यान 14 वा हफ्ता वितरीत केला होता. यावेळेस या योजनेचा तब्बल 8 कोटी 50 लाख लाभार्थ्यांना फायदा झाला आहे. केंद्र सरकारला त्यामुळे 17 हजार कोटी रुपये खर्च करावे लागले आहेत.