
येत्या 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराचं उद्घाटन केलं जाणार आहे. या उद्घाटनाआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्या दौऱ्यावर येणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी अयोध्या नगरी सज्ज आहे. ठिकठिकाणी मोदींच्या स्वागताचे बॅनर लागले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कटआऊट स्टॅंडी लावण्यात आले आहेत. पंतप्रधान मोदी यांचं अयोध्या नगरीत स्वागत असे पोस्टर लावण्यात आले आहेत.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्येत येत असल्याने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. पारंपरिक पद्धतीने त्यांचं स्वागत केलं जाणार आहे.

अयोध्या विमानतळ ते धरमपथ, रामपथ मार्गे रेल्वे स्थानक परिसरात जय्यत तयारी केली गेली आहे. 1400 हून अधिक लोककलाकार सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत त्यांचं स्वागत करतील. संगीत, वादन, पारंपरिक पारंपरिक भेष गायनाने त्यांचं स्वागत केलं जाईल.