
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे सध्या भव्य शिवशक्ती परिक्रमा यात्रा करत आहेत. यात त्या महाराष्ट्रातील विविध ठिकाणी भेटी देत आहे.

पंकजा मुंडे यांचं ठिकठिकाणी भव्य स्वागत होत आहे. गंगाखेडमध्ये आमदार रत्नाकर गुट्टे आणि मुंडे समर्थकांनी फुलांची उधळण करत पंकजा यांचं स्वागत केलं.

पंकजा मुंडे यांनी गंगाखेडच्या स्थानिक महिलांसोबत पारंपरिक नृत्य केलं. त्याचाच हा फोटो...

परळी शहरात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पंकजा मुंडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. पुढे त्या औंढा नागनाथच्या दिशेने रवाना झाल्या.

किती दिवसांनी बाबांना भेटले..., असं म्हणत पंकजा मुंडे यांनी या हळव्या क्षणाचा फोटो शेअर केलाय.