
रत्नागिरीतील खेडमधील गोळीबार मैदानात आयोजित करण्यात आलेल्या सभेतून मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांनी याप्रसंगी अतिविराट समुदायाला संबोधित केलं.


शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीचा नव्हे तर विचारांचा वारसा पुढे घेऊन चाललो आहोत त्यामुळे त्यांचे विचार हेच आमची संपत्ती असून ती आमच्यासाठी आयुष्यभराची शिंदे म्हणाले.

आपण 2019 साली केलीत ती खरी गद्दारी होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाचा दिवा आपल्या डोक्यात पेटवल्याने सन्माननीय बाळासाहेबांच्या विचारांना तुम्ही तिलांजली दिलीत, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

दाऊदशी व्यवहार करणाऱ्यांना पाठीशी घातलंत, हिंदुत्वाचा विचार सोडून दिलात, सावरकरांवर टीका करणाऱ्यांकडे दुर्लक्ष केलंत, बाळासाहेबांना हिंदुहृदयसम्राट म्हणायला तुमची जीभ कचरायला लागली त्यामुळेच हिंदुत्ववादी विचार जागे ठेवण्यासाठी आम्हाला वेगळी भूमिका घ्यावी लागली असंही शिंदे यांनी नमूद केलं.

डिसेंबरपर्यंत मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण करण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. तसेच कोकणात समृद्धी महामार्गाप्रमाणे ग्रिनफिल्ड महामार्ग तर किनारी भागांना जोडणारा कोस्टल महामार्ग तयार करण्यात असल्याचे देखील जाहीर केलं.