
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यातील नवीन सरकार स्थापन झाले आहे.

सरकार स्थापनेनंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीतील काही वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. या भेटीवेळी महाराष्ट्रातील संस्कृतीचे दिल्लीत अनोखे दर्शन पाहायला मिळाले.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर काल आणि आज पहिलाच दिल्ली दौरा केला. यावेळी त्यांनी एकूण ७ नेत्यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी 5 निरनिराळ्या मूर्ती देऊन महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवले. याचे काही फोटोही समोर आले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना विठ्ठल-रुख्मिणीची मूर्ती भेट म्हणून दिली. तसेच भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनाही विठ्ठल-रुख्मिणीची मूर्ती भेट म्हणून देण्यात आली.

देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना छत्रपती शिवरायांची मूर्ती भेट म्हणून दिली.

तसेच देवेंद्र फडणवीसांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना वीर सावरकरांची मूर्ती भेट म्हणून दिली.

त्यापाठोपाठ देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेतली. त्यांना गाय-वासरुची मूर्ती भेट म्हणून दिली.

तसेच केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांना देवेंद्र फडणवीस यांनी सिद्धीविनायकाची मूर्ती भेट म्हणून दिली.

तर देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट घेतली. यावेळी नितीन गडकरींना सिद्धीविनायकाची मूर्ती भेट म्हणून देण्यात आली.