
किशोर पाटील, प्रतिनिधी- Tv9 मराठी, जळगाव | 16 जानेवारी 2024 : काल संक्रातीचा सण झाला. त्यानिमित्त राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी महिला चालक असलेल्या गुलाबी रिक्षातून प्रवास केला.

रस्ता सुरक्षा कार्यक्रमाला मंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते. यावेळी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षक कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत गुलाबी रिक्षातून प्रवास केला.

मंत्री गुलाबराव पाटील यांनी गुलाबी रिक्षा चालक 7 महिलांना तिळगूळ वाटप केलं आणि त्यांना मकरसंक्रातीच्या शुभेच्छा दिल्या.

मंत्री गुलाबराव पाटील यांना रिक्षातून प्रवास केला. हे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. यावेळी त्यांनी महिला रिक्षा चालकांशी संवाद साधला. त्यांचे प्रश्न जाणून घेतले.

रिक्षा चालक महिला यांना प्रोत्साहन मिळावं.त्यामुळे त्यांच्याच रिक्षातून शहरात फेरफटका मारला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या रिक्षाचालक महिलांना भावी जीवनासाठी सदिच्छा दिल्या, अशी प्रतिक्रिया यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.