
नागपूरमधल्या महालक्ष्मी जगदंबा मंदिर संकुलात बांधलेल्या भव्य भारतीय विद्या भवन सांस्कृतिक केंद्राचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते उदघाटन झालं.

उद्घाटनाच्या या कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आणि मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारतीय विद्या भवन सांस्कृतिक केंद्राची पाहणी केली. त्याचा हा फोटो...

नागपुरातील भव्य भारतीय विद्या भवन सांस्कृतिक केंद्राचा फोटो समोर आला आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज त्या शिर्डीमध्ये जाणार आहेत. तिथे त्या साईंच्या चरणी नतमस्तक होणार आहेत.