
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'डोमिनिका अवार्ड ऑफ ऑनर' पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. डोमिनिका या देशाने सर्वोच्च सन्मान देत नरेंद्र मोदी यांचा सन्मान केला आहे.

2021 मध्ये नरेंद्र मोदी यांनी डोमिनिका देशाची मदत केली होती. अॅस्ट्राझेनेका या कोरोना लसीचे 70 हजार डोस भारताने डोमिनिका देशाला दिले होते. कठीण काळात भारताने केलेली मदत लक्षात घेत डोमिनिकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सन्मान करण्यात आला आहे.

Narendra Modi

कोरोनाकाळातील मदतीला डोळ्यासमोर ठेवून सन्मान करण्यात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलं. हा केवळ माझा एकट्याच्या सन्मान नाही. तर हा 140 कोटी भारतीय नागरिकांचा सन्मान आहे, असं प्रतप्धान नरेंद्र मोदी म्हणाले.

PM Narendra Modi