
"मुंबईहून लंडन आणि लंडनला मुक्काम करुन आपल्या पुणे जिल्ह्यापेक्षाही लोकसंख्येनं कमी असलेल्या स्कॉटलंडला पोहोचतोय. लंडन ते स्कॉटलंड हवाई अंतर अवघं दीडेक तासांचंच, पण या प्रवासात दिसणारं विहंगम दृश्य नक्कीच चुकवणार नाही. या टप्प्याची प्रचंड उत्सुकता आहे", असं कॅप्शन देत, पहिला फोटो शेअर करत पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आपण स्कॉटलंडमध्ये असल्याचं सांगितलं.

स्कॉटलंडमधील सर्वात मोठं शहर म्हणजे ग्लासगो. सर्वात मोठं ते अर्थकारणाच्या आणि लोकसंख्येच्या अर्थानं. इथली लोकसंख्या आपल्या पुण्याच्या लोकसंख्येच्या निम्म्याहूनही कमी. पण हेच शहर ब्रिटीश राजवटीच्या काळात इंग्रजांचं दुसऱ्या क्रमांकाचं महत्त्वाचं शहर होतं. इथल्या विमानतळावर दाखल होताच, इथल्या निसर्गाने साद तर दिलीच, पण ब्रिटीशांच्या इतिहासाच्या पर्वाची साक्षही, असं म्हणत त्यांनी आपले फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांकडून लढलेल्या आणि शहीद झालेल्या ब्रिटीश सैन्याचे अधिकारी आणि सैनिकांच्या स्मृती जतन करण्यासाठी उभारलेल्या कमांडो मेमोरियलला आज भेट दिली. असं कॅप्शन देत त्यांनी आपले आणखी काही फोटो शेअर केले.

सैन्य प्रशिक्षण आणि कमांडो मेमोरियल असा परिसर भारावून टाकतो. मनाला उभारी देतो, असं म्हणत त्यांनी आपले फोटो सोशल मीडियावर अपलोड केले आहेत.

'हिरवे हिरवे गार गालिचे, हरीत तृणांच्या मखमालीचे' बालकवींच्या ओळींची आठवण करुन देणारी स्कॉटलंडच्या अद्भुत निसर्गाची ही दृश्यं शब्दशः थक्क करतात, असं म्हणत त्यांनी आणखी काही फोटो शेअर केलेत.

मुरलीधर मोहोळ सध्या स्कॉटलंडमध्ये आहेत. तिथल्या ऐतिहासिक आणि पर्यटन स्थळांना ते भेटी देत आहेत. त्याचे फोटो ते आपल्या सोशल मीडियावर शेअर करत आहेत.